Jui Gadkari saam tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari : "रस्ते नाहीत, खूप त्रास झालाय..."; मढ आयलँडची भीषण परिस्थिती पाहून जुई गडकरी भडकली, पाहा VIDEO

Jui Gadkari On Madh Island Traffic Jam : ठरलं तर मग! फेम मराठी अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने मढ आयलँडची दुरावस्था दाखवली आहे.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री जुई गडकरी सध्या 'ठरलं तर मग!' मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जुईने सोशल मीडियावर संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये तिने मढ आयलँडच्या रस्त्याची दुरावस्था दाखवली आहे.

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

अनेक कलाकार कायम सामाजिक प्रश्नांवर बोलताना दिसतात. कधी पाणी असो, कधी स्वच्छता असो , कधी वाहतूक तर कधी पावसाळा रोजच्या जीवनात प्रवास करताना अनेक संकटांना सामोर जावे लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचे संकट म्हणजे वाहतूक कोंडी... आता यासंबंधितच मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केल आहे.

मढ आयलँड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडीवर मराठी टिव्ही अभिनेत्री जुई गडकरी हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुई गडकरीने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रस्त्यांमधील खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या खराब रस्त्यांमुळे स्थानिक नागरिकांसह कलाकारांनाही रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे तिने व्हिडिओत म्हटले आहे.

"मढ सारख्या भागाकडे प्रशासनाचे लक्षच नाही का?" असा थेट सवाल जुई गडकरीने केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नागरिकांनीही तिच्या संतापाला दुजोरा दिला आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकरी आणि कलाकार मंडळी कमेंट करताना दिसत आहेत.

जुई गडकरी पोस्ट

जुई गडकरीने पोस्टमध्ये म्हटल्यानुसार, जुई गडकरी साडेतीन वर्षे मड आयलँडमध्ये शूट करते आहे. येथे कुठल्याच सुविधा नाहीत. ती ज्या एरियातून येते. तो डिफेन्स एरिया आहे तरी त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले आहे. गेली साडेतीन वर्ष तेथे रस्त्याचे काम सुरू आहे. काम अगदी आरामात सुरू आहे. रोज नवीन खड्डे, रोज नवीन त्रास असल्याचे जुईने म्हटले आहे. येथे प्रचंड ट्रॅफिक लागते. मढमधून बाहेर पडायला कधी कधी दोन तास लागतात.

शेवटी जुई गडकरी म्हणते की, "टॅक्स वेळेत भरा, सगळ्या गोष्टी नीट पाळा. कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करूनही जर अशी व्यवस्था असेल, तर सामान्य माणसाने नक्की काय करायचे ?" १० किलोमीटरचा रस्ता करायला साडेतीन वर्षं लागतात? असा प्रश्न जुईने केला आहे. जुई गडकरी पोस्टच्या शेवटी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, सुनेत्रा पवार, श्रीकांत शिंदे यांना टॅग करत मदत मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT