Jui Gadkari News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari Post : सहाय्यक दिग्दर्शकाचा मोठा अपघात, ७ ते ८ दिवसांपासून कोमात; अभिनेत्री जुईने चाहत्यांना केलं मोठं आवाहन

Jui Gadkari News : पावसाळ्यात आपली वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन अभिनेत्री जुई गडकरी हिने केलं आहे. नुकतंच अभिनेत्रीने ही फेसबुक पोस्ट शेअर केलेली आहे.

Chetan Bodke

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले असून अवघ्या काही दिवसांतच मालिकेने टीआरपी यादीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. अभिनेत्री कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते.

नुकतंच अभिनेत्रीने एक फेसबुक पोस्ट शेअर केलेली आहे. त्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना पावसाळ्यात आपली वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच 'ठरलं तर मग' या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा काही दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे. त्यामुळे अभिनेत्रीने चाहत्यांना पोस्ट करत वाहन सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे.

जुई गडकरीने पोस्टमध्ये लिहिलंय की, "अगदी काल परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना… मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा… पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा… घरी उशीरा जात असाल पण सुखरुप पोहचत होता! मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची??? माझी वाट बघणारं घरी कोणी नाही… पण तुमची वाट बघणारे आहेत… काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा… पावसाळा येतोय… पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्लीप होतात... तर स्वत:ची आणि इतरांची पण काळजी घ्या -तुमचाच (लाडका) रस्ता!"

"गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्नं झालंय... त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे… तो गेले ७-८ दिवस कोमात आहे. प्लिज गाड्या हळु चालवा...." सध्या अभिनेत्रीचीही फेसबूक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी तिलाही सावकाश वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT