Jui Gadkari  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jui Gadkari : जुई गडकरीचे पुढचं पाऊल; नवीन क्षेत्रात पदार्पण, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

Tharala Tar Mag -Jui Gadkari : 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने एका नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Shreya Maskar

जुई गडकरीची 'ठरलं तर मग' मालिका खूप गाजत आहे.

जुई गडकरी आता लेखिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जुई गडकरी वेब सीरिजचे लेखन करणार आहे.

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag ) मराठी मलिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत रोज नवीन काहीतरी घडताना दिसत आहे. अशात या मालिकेतील अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 'ठरलं तर मग'ची मुख्य अभिनेत्री जुई गडकरी आता एका नवीन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती जुईने (Jui Gadkari ) सोशल मीडियावर पोस्ट करून स्वतः दिली आहे.

अभिनयानंतर आता जुई गडकरी एका नवीन क्षेत्रात पदापर्ण करत आहे. 'कॉकटेल स्टुडिओज'च्या एका नव्या वेबसीरिजमधून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदा ती अभिनेत्री म्हणून नाही तर लेखिका म्हणून दिसणार आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर 'अनसॉल्व्ड' या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या वेब सीरिजची लेखिका जुई गडकरी आहे.

जुई गडकरीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. ज्यात वेब सीरिजच्या मुहूर्ताची पाटी दिसत आहे. याला तिने खूप खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "लेखिका म्हणून एक नवीन सुरूवात" यानंतर जुई गडकरीवर प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहते जुईला लेखिकेच्या रुपात पाहायला उत्सुक आहेत.

jui gadkari

जुई गडकरीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर जुई गडकरी 'ठरलं तर मग' सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तिच्या नवीन कामामुळे ती मालिकेमधून एक्झिट घेईल असे बोले जात आहे. 'ठरलं तर मग' मालिका कायम टीआरपीमध्ये टॉपवर असते. मालिकेत जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अमित भानुशाली मुख्य भूमिकेत झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT