Actor Chandrakanth Dies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

Chandrakanth Passed Away : दाक्षिणात्य अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

Chetan Bodke

टॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. चंद्रकांत याची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री पवित्रा जयराम हिचा काही दिवसांपू्र्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणाच्या अलकापूरतील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. चंद्रकांत याच्या मृत्यूने तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये हळळ व्यक्त केली जात आहे.

चंद्रकांत हा टेलिव्हिजन अभिनेता होता. चंद्रकांतची तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'चंदू' नावाने ओळख होती. त्याला ही ओळख 'त्रिनयनी' सीरियलमधून मिळाली होती. त्या मालिकेत पवित्रा आणि चंद्रकांतने एकत्र काम केले आहे. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, "पवित्राच्या मृत्यूमुळे तो तणावात होता. तो त्या तणावातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत होता." चंद्रकांत आणि पवित्राचं गेल्या सहा वर्षांपासून एकत्र राहत होते. चंद्रकांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रकांतला पवित्राच्या मृत्यूमुळे धक्का बसला. पवित्रा आणि चंद्रकांत हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्यात भावनिक संबंध होते. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने पवित्रासाठी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्टही शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT