Actress Urvashi Hospitalized Saam Digital
मनोरंजन बातम्या

Actress Urvashi Hospitalized: प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात, या कारणामुळे करावी लागली सर्जरी

Actress Urvashi Dholakia Hospitalized: 'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेत कोमोलिका नावाने घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्वशी ढोलकिया मानेवरील सर्जरीमुळे सध्या हॉस्पिटलमध्ये आहे.

Sandeep Gawade

Actress Urvashi Dholakia Hospitalized

'कसौटी जिंदगी की' या लोकप्रिय मालिकेत कोमोलिका नावाने घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्वशी ढोलकिया मानेवरील सर्जरीमुळे सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिचा मुलगा क्षितिजने रुग्णालयातील व्हिडिओ शेअर केला आहे. मानेत ट्यूमर आढळल्याने तिच्यावर नुकतीच सर्जरी करण्यात आली आहे, डॉक्टरांनी तिला सध्या आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

टेलीव्हीजनवरील लोकप्रिय मालिका 'करौटी जिंदगी की' मध्ये उर्वशीने कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही व्यक्तीरेखा चांगलीच गाजली होती. 'कही तो होगा', 'बडी दूर से आए हैं', 'चंद्रकांता', 'नागिन ६' या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. तसेच ती 'बिग बॉस १६' ची विजेतीही राहिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान उर्वशिने तिच्या प्रकृतीची सोशल मीडियावर माहिती दिली आहे. डिसेंबरमध्ये मानेत ट्युमर असल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे सर्जरी करावी लागली. सर्जरी यशस्वी झाली असून डॉक्टरांनी एक दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं तिने सांगितलं आहे. अलिकडेच तिने आपल्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. १८ व्या वर्षी घटस्फोट झाल्यानंतर कधीच खरं प्रेम मिळालं नाही. घटस्फोटानंतर अभिनय क्षेत्रात आले. मात्र इथे वैयक्तिक आयुष्यावरून कोणीही हिणवलं नाही, असं तिने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दुचाकी चालक जखमी

फेब्रुवारी महिन्यापासून अच्छे दिन सुरू; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT