Arjun Bijlani Accident In Goa  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Bijlani : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा गोव्यात अपघात, जखमी पाय पाहून चाहते चिंतेत

Arjun Bijlani Accident In Goa : अभिनेता आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेला असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना आपल्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.

Chetan Bodke

‘नागिन’ फेम अर्जुन बिजलानी हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या अभिनेता त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेला असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अर्जुन बिजलानी ह्याने त्याच्या इन्स्टा हँडलवर फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या हेल्थबद्दल माहिती दिली आहे.

अभिनेता अर्जुन बिजलानी, पत्नी नेहा स्वामी आणि मुलगा आयान हे तिघंही वेकेशन ट्रीपसाठी गोव्याला गेले होते. तिथेच त्याचा अपघात झाला. अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलेला होता. त्या फोटोमध्ये, अभिनेत्याने पायला खरचटल्याचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये, अभिनेत्याच्या पायाची जखम स्पष्ट दिसत असून त्याचा पाय रक्तबंबाळ झाल्याचेही दिसत आहे. सध्या अभिनेत्याच्या तब्येतीची विचारपूस चाहत्यांकडून केली जात आहे. अर्जुन लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करीत आहेत.

Arjun Bijlani Accident

गोव्याहून मुंबईमध्ये अभिनेता परतला असून त्याने कामाला सुरूवातही केली आहे. ‘लाफ्टर शेफ’ या कार्यक्रमामध्ये तो होस्टिंगचं काम करीत आहे. त्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याच्या होस्टिंगचंही चाहत्यांकडून कौतुक केले जाते. अर्जुनने अनेक प्रसिद्ध टीव्ही सीरियलमध्ये काम केले आहे. त्याने 'इश्क मैं मरजावा', 'प्यार का पेहला अध्याय: शिव शक्ती', 'नागिन' सह अनेक मालिकांतून तिने प्रसिद्धी मिळवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

Nagpur News: नागपूरच्या पबमध्ये टेबलच्या वादातून राडा; तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

India vs England 3rd Test Day 2 scorecard update : जसप्रीत बुमराहचा जबरा 'पंच'; इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी धुव्वा, ३८७ धावांवर गारद

Ind Vs Eng : शुभमन गिल थेट अंपायर्संना भिडला, एका चेंडूवरुन मोठा राडा; लॉर्ड्सच्या मैदानात काय घडलं?

SCROLL FOR NEXT