टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कायमच वादात राहणाऱ्या ‘बिग बॉस’ शोची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. एकीकडे ‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरू आहे तर दुसरीकडे ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू आहे. लवकरच ‘बिग बॉस ओटीटी ३’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या शोची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा सुरू आहे. आता ग्रँड फिनालेच्याच पूर्वी बिग बॉसने दोन स्पर्धकांना घराबाहेर काढलं आहे.
बिग बॉसच्या घरात शोच्या शेवटच्या दिवसांमध्ये, प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक आणि लवकेश कटारिया यांना इव्हिक्ट केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरमान मलिकला बिग बॉसच्या घरातून मतांमुळे नाही तर एका टास्कमुळे तो घराबाहेर गेला आहे. त्या टास्कची लीड सना मकबुल करणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये त्या टास्कबद्दल प्रेक्षकांना माहिती मिळणार आहे. अरमान मलिक आणि लवकेश कटारिया घराबाहेर गेल्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाला टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर लवकेशला आणि अरमानला घराबाहेर काढल्यामुळे बिग बॉसला तुफान ट्रोल केलं जात आहे. लवकेशच्या खेळीमुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण त्याने आपल्या खेळात बदल करून सर्वांचा गेम पालटत स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. तर अरमान मलिकने बिग बॉसच्या घरात त्याच्या दोन्हीही बायकांसोबत एन्ट्री घेतली होती. त्यासोबतच त्याच्या काही वागणुकीमुळे अरमानला बॉसने संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले होते.
या आठवड्यात बिग बॉसच्या अनेक स्पर्धकांनी अरमान मलिक, लवकेश कटारिया, सना मकबूल आणि साई केतन राव यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले होते. पण सोशल मीडियावर सना आणि साई घराबाहेर जाणार अशी चर्चा सुरू होती. पण अख्खा खेळ पालटला आणि बिग बॉसने लवकेश आणि अरमानला घरातून बाहेर काढले आहे. आता ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या ट्रॉफीसाठी रणवीर शौरी, सना मकबूल, कृतिका मलिक, साई केतन राव आणि रॅपर नाझी यांच्यात अंतिम लढत पाहायला मिळणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.