Duniya Geli Tel Lavat Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Duniya Geli Tel Lavat Song Out: दुनिया गेली तेल लावत..., ‘तीन अडकून सीताराम’मधील पहिलं गाणं रिलीज

Teen Adkun Sitaram Movie Song Released: ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणं नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Priya More

Teen Adkun Sitaram Movie:

मराठी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत प्राजक्ताच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चागंलीच वाढली होती. आता अशामध्ये या चित्रपटाचे पहिलं गाणं रिलीज झाले आहे. ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणं नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता 'दुनिया गेली तेल लावत' हे एनर्जेटिक गाणं रिलीज झाले आहे. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. सध्या युट्यूबर या गाण्याला चांगले व्ह्यूज मिळत आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची नेमकी काय काय धमाल चालू आहे हे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. नियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे हे तिन्ही मित्र व्हेकेशनचा पुरेपूर आनंद लुटताना या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

महत्वाचे म्हणजे, हे गाणं जयदीप वैद्य, गोपाळ ठाकरे, हृषिकेश रानडे आणि आरती केळकर या युवा गायकांनी गायले आहे. तर ॲग्नेल रोमन यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. वैभव जोशी हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. या गाण्यामध्ये वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी धम्माल करताना दिसत आहे.

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन प्रकाश वैद्य हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'दुनिया गेली तेल लावत', अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटामध्ये प्राजक्ता माळीसोबत अभिनेता वैभव तत्ववादी, हृषिकेश जोशी, आलोक राजवाडे आणि संकर्षण कर्‍हाडेनं हे मुख्य भूमिकेमध्ये आहेत. वैभव, आलोक आणि संकर्षण हे तीन मित्र लंडनमध्ये गेलेले असतात. लंडनमधील पबमध्ये दारुच्या नशेत तिघेही धिंगाणा घालतात. दारुच्या नशेमध्ये तिघेही काहीतरी अशी गोष्ट करतात की ज्यामुळे पोलीस त्यांना अटक करतात.

आपण नशेत काय केलं याची त्यांना किंचितही जाणीव नसते. प्राजक्ता माळी ही या चित्रपटामध्ये वैभवची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्याचे कळताच प्राजक्ता तिघांना सोडवण्यासाठी धडपड करते. जेलमध्ये अडकलेल्या या तिघांचे काय होणार? प्राजक्ताला त्यांना जेलमधून बाहेर काढण्यामध्ये यश येईल की नाही? या सर्व गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्येच पाहायला मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friendship Day 2025 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्रांसाठी खास बनवा 'मिष्टी दोई', नात्यात वाढेल गोडवा

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; भारताने घेतला महत्वाचा निर्णय

Amravati News: ग्रामपंचायत कार्यालय बनला कुस्तीचा आखाडा; सरपंच आणि सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी|VIDEO

अंगावर लघवी अन् प्रायव्हेट पार्टवर काठीनं मारलं, बिल्डरचा २ तास छळ; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT