प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरी अँटीलियामध्ये मंगळवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबानी फॅमिलाचा गणेशोत्सव म्हणजे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. गणेशोत्सवानिमित्त (Ganeshostav 2023) अंबानी यांचे घर खूपच छान सजवण्यात आले आहे.
अंबानींच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींसह (Bollywood Celebrities) क्रिकेटर्स (Cricketer) आणि राजकीय नेत्यांनी (Politician) हजेरी लावली. यावेळी अंबानींच्या घरातील इनसाईड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.
मुकेश अंबानी यांच्या घरी बॉलिवूड सेलब्रिटींनी हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळ सर्वच जण खूपच सुंदर दिसत होते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सर्वच सेलिब्रिटी ट्रेडिशनल लूकमध्ये पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेभी, आलिया भट, जान्हवी कपूर, एश्वर्या राय, रवीना टंडन, अनन्या पांडे, खुशी कपूर, दिशा पटाणी, कियारा आडवाणी, मौनी रॉय, पुजा हेगडे, मानुषी छिल्लर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, एकता कपूर, दीपिका पदुकोण, करिश्मा कपूर, जेनेलिया देशमुख यांनी हजेरी लावली.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, सलमान खान, मनिष मल्होत्रा, नील नीतिन मुकेश, सिद्धार्थ मल्होत्रा, शाहीद कपूर, सिद्धार्थ रॉय कपूर, जितेंद्र कपूर, रणवीर सिंग, सुनील शेट्टी, अजय देवगण, रितेश देशमुख यांनी मुकेश अंबानी यांच्या घरी गणेशोत्सवाला हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतले. शाहरुख खानने आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत उपस्थिती लावत बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शाहरुखसोबत पत्नी गौरी, मुलगा अबराम आणि मुलगी सुहाना देखील होते.
सचिन तेंडुलकरने कुटुंबीयांसह उपस्थिती लावली. श्रेयस अय्यर, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्य कुमार यादव देखील या बाप्पाच्या दर्शनासाठी आला. के.एल राहुलने आपली पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टीसोबत हजेरी लावत बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नीसोबत अंबानींच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले. अंबानींच्या घरी आलेल्या सेलिब्रिटींचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला चांगली पसंती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.