प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरच्या घरी चोरी झाली.
इन्फ्लुएन्सरने व्हिडीओ शेअर करून घरातील पैसा आणि सोनं दाखवले.
चोरांनी कोट्यवधींचा ऐवज लंपास केला.
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरी चोरी झाली आहे. कन्याकुमारी येथील एका इन्फ्लुएन्सरने तिचे सोन्याचे दागिने मिरवताना आणि आपल्या मुलावर पैशांची उधळण करतानाचे 'रील्स' पोस्ट केले होते. आपल्या लाइफस्टाइलचे व्हिडीओ इन्फ्लुएन्सर कायम आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु यामुळे तिच्या कुटुंबाचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले. चोरांनी या माहितीचा फायदा घेतला आणि संधी साधून तिच्या घरी चोरी केली.
इन्फ्लुएन्सर मधुमिता मधु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कन्याकुमारी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नागरकोईलजवळील थामाथुकोनम येथील मधुमिता हिच्या घरी ही चोरी झाली. ती एक युट्यूब आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर आहे. तिचे पती विनोद कुमार हे व्यावसायिक आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा, खरेदीवरून घरी परतल्यावर कुटुंबाला १२० सॉव्हरिन (सुमारे ९६० ग्रॅम) सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने आणि ५०,००० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. कपड्यांच्या खरेदीसाठी बाहेर गेलेले हे कुटुंब घरी परतल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांना बेडरूममधील कपाट बळजबरीने उघडलेले आणि त्यातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे आढळले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना आढळले की, चोरांनी मागच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला होता.
तपासाचा एक भाग म्हणून पोलीस आता मधुमिताच्या सोशल मीडियावरील हालचालींची तपासणी करत आहेत. तिच्या रील्स आणि पोस्ट्समध्ये ती घरी दागिने मिरवताना, गादीवर पसरवलेली पैशांची बंडले दाखवताना आणि मुलावर पैशांची उधळण करताना दिसत आहे. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच कुटुंब दर महिन्याला सोने खरेदी करते, फॅमिली ट्रिप यासंबंधित माहितीही रील्समधून इन्फ्लुएन्सर नियमितपणे देत होती, असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांच्या मते, चोरांनी मधुमिताच्या रील्सवर लक्ष ठेवले होते आणि घर रिकामे असतानाच चोरीची वेळ साधली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.