Famous Actress 
मनोरंजन बातम्या

Famous Actress : २ दिवस सहन केलं, तिसऱ्या दिवशी दगड उचलला अन् डोकं फोडलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला छेडछाडीचा थरारक अनुभव

Actress Shared School Harassment Incident : प्रसिद्ध अभिनेत्रीने धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. सलग तीन दिवस मुलं अभिनेत्रीची छेड काढत होते.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

अभिनेत्रीची मुलांनी तीन दिवस छेड काढली

अभिनेत्रीने छेड काढणाऱ्या मुलांचे डोके फोडले

साऊथची अभिनेत्री कायदू लोहार गेल्याकाही दिवसांपासून 'इधयम मुरली' या आपल्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिच्या शालेय जीवनातील एक भयानक अनुभव सांगितला आहे. तिला त्रास देणाऱ्या मुलांना अभिनेत्रीने चक्क दगडाने मारले. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

अभिनेत्री कायदू लोहारने आपल्या दमदार अभिनयाने कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलुगुमध्ये आपले नाव कमावले आहे. कायदू लोहारही आसामची रहिवासी आहे. शालेय जीवनातील वाईट अनुभव शेअर केला आहे. दहावीला असताना अभिनेत्री घराजवळच्या क्लासला जायची. तेथून जाताना रस्त्यावर काही मुलांनी तिच्यासोबत वाईट वर्तन केले.

अभिनेत्री कायदू लोहारने 'गलाट्टा तमिळ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "वाटेत काही मुले मला चिडवायची. पहिल्या दिवशी मी विचार केला, 'ठीक आहे, जाऊ दे.' दुसऱ्या दिवशीही मी तसेच केले, पण तिसऱ्या दिवशी मी ते सहन करू शकले नाही... मला खूप राग आला होता. मी एक दगड उचलला आणि त्यांच्यावर फेकला. तो एका मुलाच्या डोक्याला लागला आणि त्याचे डोके फुटले. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले आणि मी तिथून पळून गेले. त्यानंतर काय झाले ते मला माहीत नाही..."

अभिनेत्री शेवटी म्हणाली की, "मी दिसायला शांत स्वभावाची तुम्हाला वाटत असेल पण मी चुकीचे वागणे कधीही सहन करत नाही..." कायदू लोहार हिने करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग देखील केले आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुगिलपेट्टे' या कन्नड चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Tata Aeris Launched: खुशखबर! ₹5.29 लाखांत आली टाटाची नवी कार, फीचर्सही जबरदस्त

Gold Vastu Tips: घरामध्ये सोनं ठेवण्यापूर्वी 5 महत्वाचे नियम लक्षात घ्या

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT