Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने अखेर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सामंथा गरोदर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता स्वतः अभिनेत्रीनेच ती लवकरच आई होणार असल्याची घोषणा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच तिने काही काळासाठी मॅटर्निटी ब्रेक घेणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
सामंथाने तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘माँ इंटी बंगाराम’ (Maa Inti Bangaaram) चित्रपटाच्या सक्सेस इव्हेंटमध्ये ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी तिला पुन्हा मोठा ब्रेक घेऊ नये, अशी विनंती केली. त्यावेळी सामंथा हसत म्हणाली की, 'मी आता अजून एक छोटा गॅप घेऊन मग कमबॅक करेन. मला माहीत आहे की मला आता मॅटर्निटी लीव्ह घ्यावी लागणार आहे. पण मी खूप आनंदी आहे.' तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी तिचा शुभेच्छा दिल्या.
सामंथा आणि चित्रपट निर्माता राज निडीमोरू यांच्या आयुष्यातील हा अत्यंत खास क्षण आहे. दोघांनी १ डिसेंबर २०२५ मध्ये खासगी पद्धतीने विवाह केला होता. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांतच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात ‘माँ इंटी बंगारामhttps://saamtv.esakal.com/topic/actress’च्या सक्सेस इव्हेंटमधील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये सामंथाचा बेबी बंप दिसत असल्याचा दावा अनेक चाहत्यांनी केला होता. त्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना अधिक उधाण आले. अखेर सामंथाने स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, सामंथाचा ‘माँ इंटी बंगाराम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने जगभरात ५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.