Sandhya Mane Solapurkar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sandhya Mane Solapurkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत संध्या माने सोलापूरकर यांचं निधन

Sandhya Mane Solapurkar Passed Away : ज्येष्ठ तमाशा कलावंत संध्या माने सोलापूरकर यांचे निधन झाले आहे. नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या स्व.विठाबाई नारायणगावकर यांच्या द्वितीय कन्या आणि जेष्ठ तमाशा फड मालक संध्या माने सोलापूरकर (Sandhya Mane Solapurkar ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांना तमाशा कलावंत रोहन, सुरेश सोलापूरकर हे दोन पुत्र आणि एक विवाहित कन्या असा परिवार आहे.

तमाशा फड मालक मंगल बनसोडे, मालती इनामदार, भारती सोनवणे या त्यांच्या भगिनी असून फड मालक कैलास, विजय आणि राजू नारायणगावकर हे बंधू आहेत. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील समई व थाळी नृत्य करणारी, नृत्यावर जीवापाड प्रेम करणारी प्राख्यात नृत्यांगना काळाच्या पडद्याआड गेली आहे.

तमाशा या कलेचे बाळकडू त्यांना आई विठाबाई यांच्या कडून मिळाले. मातोश्री विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशात वयाच्या दहाव्या वर्षापासून नृत्यांगाना म्हणून काम करण्यास संध्या यांनी सुरवात केली. समई नृत्यांगना म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात त्या परिचित झाल्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकी वादक पती रमेश माने यांच्याशी त्यांनी लग्न केले. नंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचा नवीन फड तयार केला.

वीस वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्या आता स्टेजवर समई नृत्य करू शकणार नाहीत. अशी परिस्थिती होती. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पायात लोखंडी सळया बसवण्यात आल्या. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर वर्षभरात त्या पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत तमाशा स्टेजवर हजर झाल्या आणि आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पतीच्या निधनानंतरही मुले रोहन, सुरेश सोलापूरकर यांच्या मदतीने त्यांनी तमाशा फड सुरू ठेवला.

शेवटच्या श्वासापर्यंत तमाशा कलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि समाज प्रबोधनाचे काम त्यांनी केले. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2020 साली माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 'तमाशा सम्राज्ञी विठाबाई जीवन गौरव पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. गुढीपाडव्यापासून तमाशाची नोंदणी करण्यासाठी नुकतीच त्यांनी नारायणगाव येथे राहुटी उभारली होती. मात्र चिकनगुनिया आजार झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. अशी माहिती मोहित नारायणगावकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT