Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठमोळी अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक आणि कवयित्री अशी सर्वगुणसंपन्न प्राजक्ता माळी आहे.
प्राजक्ता माळीसाठी २०२४ हे वर्ष फारच खास ठरलं आहे.
या वर्षात प्राजक्ताने निर्मीती क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे.
प्राजक्ताचा फुलवंती हा चित्रपट याचवर्षी रिलीज झाला.
या चित्रपटातून प्राजक्ताने तिच्या नृत्यातील अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले आहे.