Taarak Mehata Ka Ooltah Chashmah Film Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'दयाबेन लवकरच परत येणार', 'बॉयकॉट तारक मेहता' वर निर्माते असित मोदींनी सोडले मौन

Dayaben Will Soon Return In TMKOC: दयाबेनचे पात्र मालिकेमध्ये परत न आल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. अशामध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचे म्हणत ही मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

Priya More

TMKOC Fans Demand Raised To Boycott:

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ही मलिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहे. सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांपैकी ही एक मालिका आहे. पण या मालिकेमध्ये दयाबेन (Dayaben) दिसत नसल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. अशामध्ये या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनचे पात्र मालिकेमध्ये परत येणार असल्याचे आश्वासन प्रेक्षकांना दिले होते.

पण दयाबेनचे पात्र मालिकेमध्ये परत न आल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले आहेत. अशामध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचे म्हणत ही मालिकेला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर 'बॉयकॉट टीएमकेओसी' (Boycott TMKOC) ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी मौन सोडले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असित मोदी यांनी नुकतेच एक विधान जारी केले आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ऑफ एअर होणार नाही. दयाबेनच्या पात्राचा शोध सुरू असल्याचेही शोच्या निर्मात्याने सांगितले. थोडा उशीर झाला तरी पात्र लवकरच परत येईल असे असित मोदी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. असित मोदी यांनी पुढे सांगितले की, 'मी माझ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येथे आलो आहे आणि मी माझ्या प्रेक्षकांशी कधीही खोटे बोलणार नाही. फक्त काही परिस्थितींमुळे आपण दयाबेनचे पात्र वेळेत परत आणू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की हे पात्र मालिकेमध्ये येणार नाही.'

तसंच, 'आता ती दिशा वकानी आहे की आणखी कोणी, हे येणारा काळच सांगेल. पण दयाबेन मालिकेमध्ये परत येईल हे माझे प्रेक्षकांना वचन आहे आणि तारक मेहता का उल्टा चष्मा कुठेही जाणार नाही. १५ वर्षे कॉमेडी मालिका चालवणे सोपे काम नाही. सध्या दयाबेनच्या पात्रासाठी ऑडिशन्स सुरू आहेत. पात्रासाठी निवड करणे सोपे नाही आणि दिशाची भूमिका साकारणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी आव्हान असेल. या भूमिकेसाठी आमचा शोध सुरू आहे.'

दरम्यान, अभिनेत्री दिशा वकानीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये दयाबेन जेठालाल गडा ही भूमिका साकारली आहे. अभिनेत्री 2017 पासून ही मालिका सोडून ब्रेकवर गेली. ती या मालिकेत परत आलीच नाही. त्यामुळे प्रेक्षक नाराज झालेत. दिशाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे तिच या मालिकेत दयाबेनच्या भूमिकेत परत यावी अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT