OTT Web Series : डिसेंबर महिन्यात 'OTT' वर आहे अ‍ॅक्शन अन् सस्पेंसचं धमाल मनोरंजन

Bharat Jadhav

वेब सीरिजमुळे लोकप्रिय

OTT Apps वर आपण वेब सीरिज, चित्रपट, मालिका इत्यादी पाहू शकतो. हे OTT Apps मोबाईल वर किंवा स्मार्ट टीव्ही वर सुद्धा डाऊनलोड करून वापरता येतात. प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार हवे तेव्हा इंटरनेटच्या साहाय्याने आवडीचे कार्यक्रम, मालिका आणि टीव्ही शोज पाहू शकतात.

web serise | Abp

डिसेंबरमध्ये असेल मनोरंजनचा खजिना

येत्या डिसेंबर महिन्यात मनोरंजन विश्वात अनेक मोठ्या बॅनरच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ओटीटीच्या चाहत्यांना आगळी वेगळी मेजवानी ओटीटी निर्मात्यांकडून मिळणार आहेत.

OTT | boldsky

मालिका,चित्रपट आणि बरचं काही

ओटीटीवरही विविध मालिका आणि बॉलिवूड, हॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. नेटफ्लिक्स,अ‍ॅमेझॉन प्राईम, डिझ्नी हॉटस्टार आणि झी ५ वर मालिका, चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

OTT | Saam Tv

सस्पेंस 'धूथा'

ही सस्पेंस थ्रिलर वेबसीरिज आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत ही वेब सीरिज १ डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. यात नागा चैतन्य हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

OTT | amazon prime

'खिलाडी' अक्षयचं मिशन रानीगंज

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा हा चित्रपट १ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. त्यात परिणीती चोप्राची मुख्य भूमिका आहे.

OTT | Prabhat Khabar

'किंग खान'च्या लेकीचा 'द आर्चिच' सिनेमा

शाहरुखच्या लाडक्या लेकीचा अन् अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा 'द आर्चिच' ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सुहाना खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

OTT | Netflix

'चमक' वेबसीरिज

सोनी लिव ओटीटीवर चमक नावाची म्युझिकल थ्रिलर प्रदर्शित होणार आहे. पंजाब संगीत विश्वामध्ये काय काय घडामोडी होतात हे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे.

OTT | Social

झी ५ वर दिसेल 'कडक सिंग'

प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या तगड्या अभिनयाचा 'कडक सिंग' झी ५ वर येत्या ८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

OTT | Social

'द फ्री लान्सर' सीझन १द कन्क्ल्युझन

डिझ्नी हॉटस्टारवर प्रदर्शित होणारी ही सीरिज अॅक्शन थ्रिलर या प्रकारातील आहे. त्यात एकुण पंधरा एपिसोड आहेत. त्यात मोहित रैना, कश्मिरा परदेशी, अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

OTT | moive database