Sushmita Sen Turns At 48 Age Saam Tv
मनोरंजन बातम्या

Happy Birthday Sushmita Sen: कोणत्या प्रश्नामुळे सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला?, वाचा सविस्तर...

Interesting And Unknown Facts Sushmita Sen: सुष्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब कसा जिंकला?, तिला आत्मविश्वास कसा मिळाला? हे तिने एका मुलाखतीतून चाहत्यांना सांगितले.

Chetan Bodke

Sushmita Sen Turns At 48 Age

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) आज ४८ वा वाढदिवस आहे. सुष्मिताने तिच्या अभिनयामुळे अनेकांची मनं जिंकले. जरीही असं असले तरी, सुष्मिता तिच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहते. सुष्मिताने वयाच्या १६ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला आणि सर्वांचेच मन वेधले. नेमकी सुष्मिता हा किताब कशी जिंकली?, तिला आत्मविश्वास कसा मिळाला? हे तिने एका मुलाखतीतून चाहत्यांना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुष्मिताचा जन्म हैदराबादच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झाला. ज्यावेळी सुष्मिताने वयाच्या १६ व्या वर्षी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती जेमतेम १६ वर्षांचीच होती. तिच्या समोर ऐश्वर्या राय सुद्धा प्रतिस्पर्धी म्हणून होती.

एका मुलाखतीमध्ये सुष्मिताने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला? या विषयी सांगितले. “जेव्हा मी फॉर्म सबमिट करत होते तेव्हा मला ऐश्वर्या राय सुद्धा या स्पर्धेत भाग घेतेय असं सांगितले. ती भाग घेतेय, असं जेव्हा कळलं तेव्हा तब्बल २५ मुलींनी आपला फॉर्म परत घेतला. तोच विचार माझ्या मनात ही होता. पण माझ्या आईने मला साथ दिली. मी जेव्हा माझ्या आईला सांगितले की, मी फॉर्म परत घेतेय, तर माझी आई मला ओरडली. आणि माझ्या आईने मला धीर दिला.”

‘मिस युनिव्हर्स’च्या स्पर्धेमध्ये, दोघींमध्ये चांगलीच अटीतटीची स्पर्धा झाली होती. स्पर्धेमध्ये सुष्मिताला परिक्षकांनी प्रश्न विचारला की, तुला आपल्या देशाच्या वस्त्रोद्योगाबद्दल (Textile Heritage) काय माहित आहे?, वस्त्रोद्योग किती वर्ष जुने आहे? आणि तुला पर्सनली कोणते कपडे घालायला आवडते? या प्रश्नावर सुष्मिताने उत्तर दिले की, ‘मला असं वाटते, महात्मा गांधी यांच्या खादीपासूनच देशात वस्त्रोद्योग सुरु झाला. तेव्हापासूनचा हा जुना प्रवास आहे.’ या उत्तराने अभिनेत्रीने प्रेक्षकांसह सर्वांचेच लक्ष वेधले. (Bollywood)

खासगी आयुष्यामुळेही सुष्मिता नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी सुष्मिताने पहिली मुलगी रिनाला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती एक स्वत: अभिनेत्री असून उत्तम कवियित्री सुद्धा आहे. तिच्या कवितांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुद्धा होते. सुष्मिताच्या कामाबद्दल बोलायचे तर, काही महिन्यांपूर्वीच तिची बहुप्रतिक्षित ‘ताली’ वेबसीरीज जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. त्या वेबसीरीजमध्ये सुष्मिताने समाजसेविका गौरी सावंत यांची भूमिका साकारली होती. त्यासोबतच नुकतीच सुष्मिताची ‘आर्या ३’ वेबसीरीजही ‘सोनी लिव्ह’वर रिलीज झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

SCROLL FOR NEXT