Cannes Film Festivalमध्ये ऐश्वर्या राय बच्चनची जादू; पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये एलिगंट लूक

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये भारतीय तारे झगमगत आहेत. राजस्थानी गायिका मामे खान असो किंवा विश्व सुंदरी ऐश्वर्या राय, या देसी स्टार्सनी परदेशी मंचावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai BachchanInstagram

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये भारतीय तारे झगमगत आहेत. राजस्थानी गायिका मामे खान असो किंवा विश्व सुंदरी ऐश्वर्या राय, या देसी स्टार्सनी परदेशी मंचावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) मनमोहक दिसत होती. पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर पोहोचताच सगळ्यांनी श्वास रोखून धरला. तिची मोहक स्टाईल आणि रॉयल लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) ऐश्वर्याच्या लूक्सची नेहमीच चर्चा होत असते.

कान्सच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या फॅन पेजवर लेटेस्ट फोटो शेअर करण्यात आले आहेत. गुरुवारी ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर उतरताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळाले. रॉयल व्हिनस लूकमध्ये दिसणारी ऐश्वर्या कान्सच्या रेड कार्पेटवर सुंदर दिसत होती. या खास प्रसंगी ऐश्वर्या रायने डिझायनर गौरव गुप्ता यांचा स्कल्पेटेड गाऊन कॅरी केला होता. या पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

कान्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या रायच्या लूकची चर्चा झाली. ऐश्वर्याने गुलाबी रंगाच्या पँट सूटमध्ये बीन कलरची हील्स घातली होती. दुसऱ्या दिवशी, या अभिनेत्रीने एक आकर्षक काळा फ्लोरल गाऊन परिधान केला होता. तिच्या आउटफिटपासून मेकअपपर्यंत सर्वच गोष्टींची यावेळी चर्चा होत होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com