Taali Trailer Out Social Media: ‘आर्या’ वेबसीरीजनंतर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ‘ताली’ वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ या वेबसीरीजची तुफान चर्चा सुरू आहे. सुष्मिता नेहमीच वेबसीरीजबद्दल महत्वाच्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ‘ताली’ वेबसीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘ताली’चा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.
सुष्मिता सेन वेबसीरजमध्ये ट्रान्सजेंडर वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्या श्री. गौरी सावंतची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्ये सुष्मिता सेनचा अभिनय पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या वेबसीरीजमध्ये गौरी सावंत यांची थक्क करणारी कथा, ट्रान्सजेंडर वर्कर म्हणून ओळखीसाठी केलेली धडपड वेबसीरीजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये, गणेश ते गौरी सावंत असा धाडसी प्रवास आपल्याला दिसणार आहे. समाजात वावरत असताना श्री. गौरी सावंतला आपली ओळख लपवणे केवळ अवघडच नाही तर अशक्य झाल्याचेही दिसून येत आहे. (Web Series)
समाजात मिळत असलेली वागणूक पाहता गौरीसारख्या हजारो लोकांनाही समान वागणूक मिळावी, या हक्कांसाठी ती लढताना दिसत आहे. तर आपल्या हक्कांसाठी लढत असताना अभिनेत्री अनेक संकटांना सामोरे जाते. समाजाशी दोन हात करत लढत असताना, गौरी सावंत एक ट्रान्सजेंडर वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजात आपली ओळख निर्माण करते. (Bollywood)
सामाजिक कार्यकर्त्या आणि ट्रान्सजेंडर वर्कर गौरी सावंतने आतापर्यंत अनेक महत्वाचे काम केले आहे. गौरी सावंत यांचे संपूर्ण जीवन आता वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. गौरी सावंतच्या आयुष्यात आलेले चढउतार, समाजात मिळणारी वागणूक आणि गणेश ते गौरी सावंत असा धाडसी प्रवास आपल्याला वेबसीरीजमध्ये पाहायला मिळणार आहे.
सुष्मिता सेनची मुख्य भुमिका असलेली ही वेबसीरीज 'ताली' १५ ऑगस्टला स्वतंत्र दैनच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येणार आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी वेबसीरीजचे लेखन केले आहे. अर्जुन सिंह बारन, कार्तिक डी निशानदार आणि अफीफा सुलेमान नाडियाडवाला यांनी या वेबसीरीज निर्मिती केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.