Hrithik Roshan On Koi Mil Gaya : मी प्रत्येक वेळी रडायचो... हृतिक रोशनने शेअर केला 'कोई मिल गया'दरम्यानचा अनुभव

20 Year Of Koi Mil Gaya : 'कोई मिल गया' हा चित्रपट अभिनेता हृतिक रोशनच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट आहे.
hrithik roshan in koi mil gaya
hrithik roshan in koi mil gayaInstagram @hrithikroshan
Published On

Rakesh Roshan Share Experience On Koi Mil Gaya Set : 'कोई मिल गया' हा चित्रपट अभिनेता हृतिक रोशनच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर सलग तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर या चित्रपटाने त्याला समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश दोन्ही या चित्रपटाने दिले.

कोई मिल गया हा बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ठरला. हृतिकला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रोहित मेहरा या पात्राने अभिनयाचे अनेक पुरस्कार मिळवून दिले. पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत, हृतिकने ही व्यक्तिरेखा इतक्या प्रभावीपणे कशी साकारली हे सांगितले आहे.

hrithik roshan in koi mil gaya
Vijay Raghavendra Wife Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर ; ४५ वर्षीय पत्नीचे अकास्मात निधन

दिग्दर्शक राकेश रोशन आणि अभिनेता हृतिक यांनी पिंकविलाला एक खास मुलाखत दिली. चित्रपटला प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाल्याने ही मुलखात आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान या व्यक्तिरेखेविषयी असलेल्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल विचारले असता, हृतिकने उत्तर दिले की त्याने आयुष्यात आलेल्या अनुभवांचा पुरेपूर उपयोग केला आहे. तो म्हणाला, “शैक्षणिकदृष्ट्या अर्थातच डीएनए जुळत होते आणि मी माझ्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा वापर या चित्रपटामध्ये केला आहे.

मी शाळेत असताना मला गुंडगिरीचा अनुभव आला आणि मी तोतारा देखील होता. त्यामुळे, पात्राला आवश्यक असलेली गोष्टी आयुष्याने मला आधीच दिल्या होत्या. या गोष्टी, आपल्या जीवनातील हा एक मोठा धडा आहे, असे मला वाटते. आपल्याकडे जे काही चांगले किंवा वाईट आहे, त्या सर्वचा वापर होऊ शकतो, तुम्ही डोळे उघडे ठेवा आणि वाट पहा, वेळ येईल."

हृतिकने या चित्रपटाद्वारे त्याला त्याची कॉलिंग कशी मिळाली याबद्दलही सांगितले. “हा एक शिकण्यासारखं अनुभव होता कारण जेव्हा मी सेटवर आलो तेव्हा मला प्रामाणिकपणा आढळला.

स्टार आणि स्टार असलेल्या मुखवटा नाहीसा झाला. या चित्रपटामध्ये मी स्वतः असणार होतो, त्यातून मी खूप काही शिकलो. या चित्रपटातून मला मी सापडलो. मला व्यक्त होणं गरजेचं होतं आणि स्क्रिप्टच सगळं काही होतं,” असं हृतिक म्हणाला.

हृतिकने पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचल्यानंतरची रिअॅक्शन देखील यावेळी शेअर केली आहे. तो म्हणाला, “मला स्क्रिप्ट वाचायला 6 ते 7 तास लागले कारण प्रत्येक 2-3 पान वाचून झाल्यानंतर मी रडायचो. मग मी माझ्या वडिलांना फोन केला आणि म्हणालो, 'पप्पा स्क्रिप्ट माईंड ब्लोईंग आहे, विलक्षण आहे, मी संपूर्ण स्क्रिप्ट वाचताना रडलो.'

शूटिंगच्या पहिल्या दिवसाची तयारी कशी केली याबद्दल बोलताना हृतिक म्हणाला, “मी खूप घाबरलो होतो. मला वाटले की, पप्पांना मी काय करतोय हे पाहावं, माझे केस आणि माझे कपडे या सर्व गोष्टींसह लक्ष द्यावे.

पण शूटिंगच्या पहिल्या दिवसापर्यंत त्यातलं काहीच घडले नाही. त्यांचा माझ्यावर असलेला हा एक विचित्र प्रकारचा विश्वास होता आणि मला वाटले की मी फक्त माझे इंस्टींक्ट फॉलो केले पाहिजे आणि मी तेच केले.”

हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा अभिनीत कोई मिल गया हा चित्रपट त्याच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com