Vijay Raghavendra Wife Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर ; ४५ वर्षीय पत्नीचे अकास्मात निधन

Vijay Raghavendra: स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले.
Vijay Raghavendra Wife Death
Vijay Raghavendra Wife Death Instagram
Published On

Vijay Raghavendra's wife Spandana dies : कन्नड अभिनेता विजय राघवेंद्रची पत्नी स्पंदनाचे निधन झाले आहे. संपूर्ण कुटुंब बँकॉक येथे व्हेकेशनसाठी केले होतो. दरम्यान स्पंदनाला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले.

स्पंदनाच्या आकस्मिक निधनाने तिचे कुटुंबीय, नातेवाईक यांना धक्का बसला आहे. विजय आणि स्पंदना काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लग्नाचा १६ वा वाढदिवस साजरा केला होता. स्पंदना आणि विजयचे लग्न २००७ साली झाले होते. या दोघांना शौर्य नावाचा मुलगा आहे.

तुलू कुटुंबातील स्पंदना माजी पोलीस अधिकारी शिवराम यांची मुलगी आहे. २०१७साली प्रदर्शित झालेल्या रविचंद्रन यांच्या 'अपूर्व' चित्रपटामध्ये तिने कॅमिओ केला होता. तिचा हा कन्नड सिनेसृष्टीत डेब्यू असल्याचे मानले जाते.

Vijay Raghavendra Wife Death
RRKPK Box Office Collection : बॉलिवूडची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; 'रॉकी ओर रानी की प्रेमकहानी' केला १०० कोटींचा आकडा पार

अहवालानुसार, 'सोमवारी सकाळी स्पंदना जमिनीवर कोसळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. स्पंदनाचे पार्थिव मंगळवारी बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार आणण्यात येईल.'

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शोक व्यक्त केले.

ट्विटरवर पोस्ट करत सिद्धरामय्या यांनी लिहिले की, “प्रसिद्ध कन्नड अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना यांच्या अकाली निधनाची बातमी धक्कादायक आहे. दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो हीच प्रार्थना. स्पंदनाच्या निधनामुळे दु:खी झालेल्या विजया राघवेंद्र आणि बीके शिवराम यांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी ट्विट करत सांगितले की, “प्रसिद्ध कन्नड अभिनेते श्री विजय राघवेंद्र यांच्या पत्नी श्रीमती स्पंदना राघवेंद्र यांचे बँकॉकमध्ये आकस्मिक निधन झाले हे जाणून मला खूप दुःख झाले. अलीकडेच या जोडप्याने मला भेटून शुभेच्छा दिल्या. स्पंदनाच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. त्यांचे कुटुंब आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.

राजकारण आणि कन्नड चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी स्पंदना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com