सई ताम्हणकरचा ( Sai Tamhankar ) 'गुलकंद' (Gulkand ) आणि सूरज चव्हाणचा (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना तगडी टक्कर देत आहे. 'गुलकंद' कॉमेडी चित्रपट असून यात नात्यांमधली गुंतागुंत, भावना यांचा सुरेख मेळ दाखवण्यात आला आहे. 'गुलकंद' चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. तर केदार शिंदेंचा 'झापुक झुपूक' चित्रपट ही एक प्रेमकथा आहे. या चित्रपटात 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण झळकला आहे. त्याने आपल्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.
सई ताम्हणकरचा 'गुलकंद' चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने चार दिवसांत बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गुलकंद' चित्रपटाने चार दिवसांत तब्ब्ल 1 कोटी 79 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'गुलकंद' चित्रपटातून पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी एकत्र पाहायला मिळत आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून देखील खूप प्रेम मिळत आहे.
दिवस पहिला- 55 लाख
दिवस दुसरा- 25 लाख
दिवस तिसरा- 42 लाख
दिवस चौथा- 57 लाख
एकूण - 1 कोटी 79 लाख
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाला आहे. आज हा चित्रपट रिलीज होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दहा दिवसांत 'झापुक झुपूक' चित्रपटाने 1.27 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने पहिल्या दोन-तीन दिवस बंपर कलेक्शन केले. त्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे. 'झापुक झुपूक' चित्रपटाने पहिल्या- दुसऱ्या दिवशी 24 लाख, तिसऱ्या दिवशी 19 लाख, चौथ्या दिवशी 14 लाख आणि पाचव्या दिवशी 17 लाख रुपयांची कमाई केली आहे.
'झापुक झुपूक' चित्रपटाने नवव्या दिवशी फक्त 1 लाख रुपयांची कमाई केली आहे. पाच दिवसानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झपाट्याने घट होताना पाहायला मिळत आहे. सई ताम्हणकरचा 'गुलकंद'चित्रपटाने सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपटाला मागे टाकले आहे. आता भविष्यात पुन्हा 'झापुक झुपूक' बाजी मारेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.