Zapuk Zupuk Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Zapuk Zupuk Box Office Collection : रिलीजच्या तिसऱ्या दिवशी सूरजची जादू फेल, 'झापुक झुपूक'च्या कमाईत घसरण

Zapuk Zupuk Box Office Collection Day 3 : 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती लाखांची कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या 'झापुक झुपूक' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'झापुक झुपूक'च्या (Zapuk Zupuk) टीमने चित्रपटाचे धमाकेदार प्रमोशन केले होते. हा चित्रपट रिलीज होऊन आता तीन दिवस झाले आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे.

'झापुक झुपूक' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

सूरजचा 'झापुक झुपूक' चित्रपट रिलीज होऊन आता तीन दिवस झाले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवस बंपर कमाई केली आहे. मात्र आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'झापुक झुपूक' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 लाख

  • दिवस दुसरा - 24 लाख

  • दिवस तिसरा - 19 लाख

तीन दिवसांत सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाने तब्बल 67 लाख रुपये कमावले आहेत. रविवारी 'झापुक झुपूक'चित्रपट आपली जादू दाखवण्यास कमी पडला आहे. रविवार असूनही चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट होताना दिसत आहे.

'झापुक झुपूक' चित्रपट

'झापुक झुपूक'च्या 'झापुक झुपूक' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळत आहे. 'झापुक झुपूक' ही एक प्रेम कथा आहे. या चित्रपटाचे आणि सूरजच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सूरजच्या साध्याभोळ्या स्वभावाने चित्रपटाला चारचाँद लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Maharashtra News Live Update: सिव्हिल ड्रेसवरील लोकांकडे पोलिसांकडे काठ्या कशा, उद्धव ठाकरेंचा सवाल

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT