Shreya Maskar
भाजणी न करता करा मालवणी वडे, मस्त खमंग आणि खुसखुशीत! करा खास पावसाळी बेत मालवणी वडे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, बेसन, तांदळाचे पीठ, रवा, गूळ, मीठ, बडीशेप, धणे, मेथी दाणे, हळद, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मालवणी वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, रवा मिक्स करून घ्या.
आता या मिश्रणात पाणी, गूळ, चवीनुसार मीठ घालून एक उकळी काढून घ्या.
छोट्या पॅनमध्ये बडीशेप, धणे आणि मेथी दाणे भाजून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
पिठाच्या मिश्रणात मसाला, हळद, बडीशेपची पेस्ट आणि गरम पाणी घालून पीठ चांगले मळून घ्या.
तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याला वड्याचा आकार द्या.
आता गरम तेलात मध्यम आचेवर मालवणी वडे खरपूस तळून घ्या.
गरमागरम भाजी, चिकन, मटण सोबत या मालवणी वड्यांचा आस्वाद घ्या.