Shreya Maskar
फणसाचे पकोडे बनवण्यासाठी फणस, बेसन, लाल तिखट, आमचूर पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
फणसाचे पकोडे बनवण्यासाठी सर्वप्रथम फणस कापून त्याच्या बिया वेगळ्या काढून घ्या.
फणस आणि फणसाच्या बिया मीठ घालून कुकरमध्ये शिजवा.
त्यानंतर शिजवलेल्या बियांची साल काढून त्याचे तुकडे करा.
कापलेल्या फणसाच्या बियांमध्ये मीठ, हळद, बेसन घालून छान मिक्स करून घ्या.
यात शिजवलेला फणस देखील मॅश करून टाका.
तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून पकोडे तेलात खरपूस तळून घ्या.
गरमागरम चहासोबत फणसाच्या पकोड्यांचा आस्वाद घ्या.