Gadar 2 Day 6 Box Office Collection Saam TV
मनोरंजन बातम्या

Gadar 2 Box Office Collection: 'गदर 2'चा धुमाकूळ; 6 दिवसात 250 कोटींची कमाई, शाहरुखच्या 'पठान'चा रेकॉर्ड मोडणार?

Gadar 2 6th Day Collection: स्वातंत्र्य दिनी झालेला चित्रपटाचे 55 कोटी रुपयांचे कलेक्शन पाहून अनेक विश्लेषकांना आश्चर्य वाटले.

Pooja Dange

Gadar 2 Day 6 Box Office Collection:

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वातंत्र्यदिनी 55 कोटींच्या मोठ्या कमाईनंतर, चित्रपटाच्या कमाईत बुधवारी घसरण झाली. पण तरीही चित्रपट विश्लेषकांच्या अंदाजानुसार 34.50 कोटींचे कलेक्शन करता आरामात 250 कोटींचा टप्पा ओलांडला, असे Sacnilk.com ने अहवाल दिले आहे. हा चित्रपट लवकरच ₹ 300 कोटींचा टप्पा पार करेल.

गदर 2 बॉक्स ऑफिसवर

गदर 2 आता देशांतर्गत एकूण ₹ 263.48 कोटी आहे. प्रदर्शनाच्या दिवशी (शुक्रवारी) चित्रपटाने 40 कोटींची ओपनिंग केले आणि रविवारी हे कलेक्शन 51 कोटींवर पोहोचले. सोमवारी कलेक्शन कमी म्हणजे 38.7 कोटी झाले.

परंतु स्वातंत्र्य दिनी झालेला चित्रपटाचे 55 कोटी रुपयांचे कलेक्शन पाहून अनेक विश्लेषकांना आश्चर्य वाटले. आता यावर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या पठानला गदर २ मागे टाकू शकेल का? असा प्रश्न विश्लेषक देखील उपस्थित करत आहेत.

सनी देओल भारावला

सोमवारी एका पत्रकार परिषदेत सनी देओल भारावून गेला दरम्यान त्या वेळी तो म्हणाला, "चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मी खूप तणावात होतो. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी रात्रभर रडलो आणि हसलो. माझे वडील आजूबाजूलाच होते आणि त्यांनी मला पाहिले. मी त्यांना सांगितले. , 'मी दारू प्यायलो नाही. मैं खुश आ में की करा (मी खुश आहे, मी काय करू शकतो)'."

अनिल शर्मा दिग्दर्शित, गदर 2 हा 2001 च्या ब्लॉकबस्टर गदरचा सीक्वल आहे ज्यामध्ये सनी देओलने तारा सिंग या ट्रक ड्रायव्हरची भूमिका केली होती, तर अमीषा पटेलने सकीनाची भूमिका केली होती. तो 1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळेची ही कथा आहे. (Latest Entertainment News)

गदर 2 1971 च्या कालखंडावर आधारित आहे. तारा सिंग त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी पाकिस्तानात जातो. तारा सिंगच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्माने केली होती. या चित्रपटात मनीष वाधवा, गौरव चोप्रा, सिमरत कौर, लव सिन्हा, रोहित चौधरी, मधुमालती कपूर, राकेश बेदी, मुश्ताक खान आणि डॉली बिंद्रा यांच्याही भूमिका आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT