Suniel Shetty Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunil Shetty's Controversy On Tomato : टॉमेटोच्या भाववाढीच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीची माघार;माफी मागत म्हणाला,"मी कधीच शेतकऱ्यांच्या..."

Sunil Shetty Clarifies Statement On Tomatoes : सुनील शेट्टींनी टॉमेटोच्या भाववाढीच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sunil Shetty's Controversy On Tomato Price : बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच त्यांची राजकारण आणि समाजकारणावरील मत मांडत असतात. राज्यात सध्या टॉमेटोचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर बॉलिवूडचे अन्ना म्हणजेच सुनील शेट्टींनी वक्कतव्य केले होते. यानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण आता सुनील शेट्टींनी त्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.

टॉमेटोचे भाव हा सध्याचा ट्रेडिंगचा विषय आहे. नुकतच एका मुलाखतीत सुनील शेट्टींनी टॉमेटोचे भाव वाढल्याने त्यांच्या घरीही परिणाम झाल्याचे सांगितले.टॉमेटोच्या वाढत्या किंमतीमुळे आम्ही घरी कमी टॉमेटो खातो. टॉमेटोच्या भाववाढीचा परिणाम सेलिब्रटींच्याही आयुष्यावर होतो. असं सुनील शेट्टी म्हणले.

सुनील शेट्टीच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणही चांगलच तापलं होतं. अनेक राजकीय मंडळीनी सुनील शेट्टींवर टीकादेखील केली होती. टोमॅटोच्या भाववाढीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी यांची परिस्थिती सुधारली आहे. आता सुनील शेट्टीने त्याच्या या वक्तव्यावर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

एका वृत्तानुसार, 'माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी कधीच शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचा विचार करणार नाही. मी कायम त्यांच्या भल्याचा विचार करतो. नेहमी त्यांना पाठिंबा देतो. आपण नेहमीच आपल्या मातीततल्या गोष्टींना प्रचार करायला हवा. त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवाची मदत होईल. माझे स्वतःचे हॉटेल असल्याने माझा शेतकऱ्यांशी थेट संबंध येतो. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणालाही दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो. मी कधीही त्यांना दुखावेल असे बोलण्याचा विचारही करणार नाही', असं सुनील शेट्टींनी स्पष्ट केले.

सुनील शेट्टी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. सुनील शेट्टी हे अभिनेत्यासोबीत एक उद्योजकही आहे. त्यांचे संपूर्ण भारतात हॉटेल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT