Baipan Bhaari Deva 20th Day Box Office Collection: सध्या ‘बाईपण भारी देवा’चित्रपटाची थिएटरसह सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींचा पल्ला पार केला आहे. थिएटर असो किंवा महिलांचा गॉसिप कट्टा, सध्या या चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
महिलांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत स्वत:च्या नावाने नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ‘बाईपण भारी देवा’ची सध्या बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यातही कमाईचा आलेख आणखीनच उंचावत आहे.
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले तरी, कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत चित्रपटाने पन्नास कोटींचा पल्ला पार केला असून २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. कमाईमध्ये अव्वल ठरलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींसकडून, चित्रपट समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून आपल्या कामाची पोचपावती मिळवली.
जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची कथा असलेल्या चित्रपटाला प्रेक्षक चांगलेच प्रतिसाद देत आहेत. चित्रपट पाहताना प्रत्येक स्त्री हा चित्रपट स्वत:सोबत रिलेट केला आहे. अनेक महिलांनी थिएटरबाहेर चित्रपट पाहण्यासाठी एकच गर्दी केली. चित्रपटाला तिसऱ्या आठवड्यातही चांगलाच भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने मंगळवारी अर्थात १९ व्या दिवशी देखील दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने काल २.२० कोटी इतकी कमाई केली असून एकूण ५५.३० कोटींचा पल्ला गाठला आहे.
चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटात ६ गुणी अभिनेत्रींनी अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.