Harshada Khanvilkar In Sukh Mhanje Nakki Kay Asta Instagram
मनोरंजन बातम्या

Harshada Khanvilkar: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट, होणार बड्या अभिनेत्रीची एन्ट्री

Harshada Khanvilkar Latest Serial: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमध्ये सध्या अनेक नवनवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे गेले असून लवकरच मालिकेमध्ये नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

Chetan Bodke

Harshada Khanvilkar In Sukh Mhanje Nakki Kay Asta

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सध्या टीआरपी चार्टमध्ये चांगल्याच चर्चेत आहेत. अशातच बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे प्रेक्षकवर्ग नाराज होत असल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा मालिकेत नवे बदल पाहायला मिळणार आहे. (Serial)

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु झाला असून मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं आहे. मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. (Marathi Actress)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट प्रेक्षकांना नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. नव्या अध्यायामध्ये, नित्या-अभिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणते नवे पात्र असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची मालिकेमध्ये धमाकेदार एण्ट्री होणार असून त्या सरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Film)

मालिकेमध्ये, हर्षदा खानविलकर सरपंच वसुंधरादेवी अहिरराव हे पात्र साकारणार आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेपेक्षा वेगळी आणि हटके भूमिका असेल. “आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. नेहमीप्रमाणेच हे पात्र सुद्धा वेगळे आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकेंपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. अत्यंत साधी रहाणी असलेल्या वसुंधरादेवीचा गावात मात्र दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापुरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे.” आपल्या भूमिकेबद्दलची प्रतिक्रिया अभिनेत्री हर्षदा खानविलकरने दिली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT