Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Kapil Honrao Post Instagram
मनोरंजन बातम्या

Kapil Honrao Post: ‘इतका साधा माणूस मला नव्हता पटत...’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील मल्हारने शेअर केला मालिकेतला प्रवास

Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Latest Update: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता कपिल होनरावने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत मालिकेतील प्रवासाबद्दल भाष्य केलंय.

Chetan Bodke

Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Kapil Honrao Post

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सध्या टीआरपी चार्टमध्ये चांगल्याच चर्चेत आहे. इतर मालिकेंप्रमाणेच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना आपण पाहिली आहे.

आजपासून अर्थात २० नोव्हेंबरपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं आहे. मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना अनेक पात्र मालिकेमध्ये पाहायला मिळणार नाहीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालिकेला आजपासून नवा ट्रॅक मिळाला आहे. नवा ट्रॅक मिळणार म्हटल्यावर, अनेक पात्रांना मालिका सोडायला लागणार आहे, तर अनेक नव्या चेहऱ्यांना मालिकेमध्ये संधी मिळणार आहे. अशातच प्रमुख भूमिकेत असणाऱ्या काही चेहेऱ्यांचा प्रवास आज इथेच संपणार आहे. नुकतंच अभिनेता कपिल होनरावने एक पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांसोबत आपल्या मालिकेतील प्रवासाबद्दल भाष्य केलंय. (Serial)

कपिल होनरावने मालिकेमध्ये, मल्हार शिर्के पाटलाचं पात्र साकारलंय. मंदार जाधवच्या मोठ्या भावाचे हे पात्र आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना कपिल होनरावने मालिकेतील काही फोटो शेअर केले. “९०० प्लसच्या वर एपिसोड, साडे तीन वर्षांचा प्रवास काल थांबला. सुख अजुन काय असत. ह्या सीरियलने जे सुख मला दिलय. ते मी शब्दांत माडू शकणार नाही. नाव, ओळख, प्रसिद्धी, यश. सगळं सगळं ह्या एका मल्हारने कपिलला दिलंय. मल्हार असा इतका साधा माणुस असतो हेच सुरवातीला मला पटत नसे पण हळू हळू. त्याचा समजूतदारपणा त्याचं साधेपण, सगळ्यांवर कशाची ही अपेक्षा न ठेवता प्रेम करणं. कमी बोलणं हे नंतर स्क्रीनवर करता करता आवडू लागलं.” (Marathi Film)

“मल्हार जरी आत्ता नसला तरी त्याचे हे सगळे चांगले गुण कायम आता माझ्यासोबत असतील. तुम्ही प्रेक्षकांनी मला जे भर भरुन प्रेम दिलंय त्याचा मी कायमचा ऋणी असेल. तुमचे लाख लाख आभार. असेच तुमच प्रेम कायम असू द्या. मला ही संधी दिली त्या बद्दल स्टार प्रवाहचे खूप आभार. कोठारे व्हिजनचे खूप आभार. भेटू लवकरच नवीन रुपात नवीन वेषात. तुमच्या सर्वांचे मन:पूर्वक आभार.” अशी पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT