Shah Rukh Khan Video:...म्हणून शाहरूखला म्हटलं जातं 'किंग खान', वर्ल्डकप फायनलदरम्यानच्या 'त्या' व्हिडीओने जिंकलं सर्वांचं मन

Shah Rukh Khan And Asha Bhosle: हा सामना पाहण्यासाठी व्हीआयपी स्टँडवर शाहरुख खानच्या शेजारी ९० वर्षांच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले बसल्या होत्या.
Shah Rukh Khan Viral Video
Shah Rukh Khan Viral Video Saam Tv
Published On

World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ चा (World Cup 2023) अंतिम सामना रविवारी भारत-ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये (ind vs aus final match) पार पडला. हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या कुटुंबीयांसोबत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हजेरी लावली.

हा सामना पाहण्यासाठी व्हीआयपी स्टँडवर शाहरुख खानच्या शेजारी ९० वर्षांच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) बसल्या होत्या. यावेळी या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स शाहरुख खानचे जबरा फॅन झाले आहेत. सध्या सर्वस्तरावरून शाहरुख खानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या या मन जिंकणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शाहरुख खानचं मोठं मन आणि मोठ्या व्यक्तींप्रती असणारा सन्मान पुन्हा एकदा या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना पाहायला मिळाला. शाहरुखने आशा भोसले यांना मदत केली. क्रिकेटचा सामना पाहताना आशा भोसले चहा प्यायल्या आणि त्यांनी नाश्ता केला. त्या हातामध्येच चहाचा रिकामा कप आणि प्लेट घेऊन तशाच बसल्या होत्या. शाहरुख खानचे लक्ष आशा भोसले यांच्याकडे जाते आणि तो त्यांच्या हातातील कप आणि प्लेट घेतो आणि बाहेर फेकण्यासाठी घेऊन जातो. तेवढ्यात एक स्टाफ मेंबर शाहरुखच्या हातामधील कप आणि प्लेट घेऊन जातो.

शाहरुख खानची ही स्टाईल पाहून चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून शाहरुखचे चाहते म्हणतात की, 'याला म्हणतात खरा पठान जो मोठ्या व्यक्तींचा सन्मान करतो आणि काळजी घेतो.' तर काहींनी 'म्हणून तर शाहरुखला किंग खान म्हणतात', असं म्हटलं आहे. ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील शाहरुख खानचे अशाप्रकारचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, शाहरुख खान लवकरच त्याच्या या वर्षातील तिसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो 'डंकी' या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राजकुमार हिराणींसोबत काम करत आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर २२ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावर्षी त्याच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत जबरदस्त कमाई केली. जानेवारीत त्याचा 'पठाण' चित्रपट रिलीज झाला. ज्याने जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई केली. तर अॅटलीसोबतचा त्याचा दुसरा चित्रपट 'जवान'ने देखील रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटाने 'पठाण'चा देखील रेकॉर्ड मोडला. या चित्रपटांशिवाय त्याने सलमान खानच्या 'टायगर ३'मध्येही कॅमिओ केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com