Suhrat Joshi google
मनोरंजन बातम्या

Suhrat Joshi: सुव्रत जोशीला नेटकऱ्यांनी का घातल्या शिव्या? स्वत: खुलासा करत म्हणाला....

Chhava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठे आणि उत्तम नटांनी काम केले आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठे आणि उत्तम नटांनी काम केले आहे. त्यातीलच कान्होजींच्या भुमिकेत असणाऱ्या सुव्रत जोशीने एका मुलाखतीत त्याच्या भूमिकेबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. मुळात 'छावा' चित्रपटात सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये या दोघांनीही नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या.

'छावा' चित्रपटात बरेच मराठी कलाकार झळकले आहेत. त्यातीलच एक म्हणजे ' दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचणारा अभिनेता सुव्रत जोशी या चित्रपटात दिसला. त्याने या चित्रपटात कान्होजींची भुमिका चोख पार पाडली. या निमित्ताने त्याच्या अनेक मुलाखती झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या 'लोकशाही फ्रेंडली'च्या मुलाखतीत. त्याने 'छावा' चित्रपटाच्या कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी का लावली नाही? या प्रश्नांच उत्तर दिलं.

या मुलाखतीत मराठमोळा सुव्रत जोशी म्हणाला, '' माझ्या फॅमिलीने माझ्या मित्रांनी तसेच माझ्या काही अमराठी मित्रांनी आणि त्यांच्या फॅमिलीने 'छावा' चित्रपट फार प्रमाने पाहिला. त्यांनी फक्त माझ्या नाही तर सगळ्या कलाकारांच्या कामाचं खूप कौतुक केलं. इतकच नाही तर जगभरातून अनेक लोकांनी मला कॉल, मेसेज करत अनेक शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाच्या निमित्ताने मी अनेक मुलाखती दिल्या. त्यामध्ये मला सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ' तू चित्रपटाच्या स्क्रीनिंगला वगैरे का गेला नाहीस?' याचं उत्तर म्हणजे मी दहा दिवस अॅमस्टरडॅमला होतो. त्याच दिवशी तिथे नाट्य महोत्सव होता आणि मी प्रमुख पाहूणा होतो.''

पुढे सुव्रतने सगळ्यात मोठा प्रसंग सांगितला, '' शुभेच्छांच्या मेसेजमध्ये जवळपास ६० ते ७० मेसेज फार भयानक होते. त्यामध्ये आम्हाला तुझा खूप राग आलाय, तुझी आता चिड येतेय. आम्ही तु अशी भुमिका करशील असा कधी विचारच केला नव्हता. त्यामध्ये अनेकांनी भावनेच्या भरात मला खूप शिव्या दिल्या होत्या. पण हेच माझ्या कामाचं यश आहे. त्यामुळे मी ते फार सकारात्मकतेने घेतलं आहे. '' असे मत त्याने दिले. सध्या हा सिनेमा जगभरात ६०० कोटींहून अधिकची कमाई केलेला मोठा सिनेमा ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, नंतर UPSC केली क्रॅक; निर्भीड IPS ऑफिसर विकास वैभव यांचा प्रवास

Wednesday Horoscope : वाटे वाटेवर अडचणीचा अनुभव यईल; ५ राशींच्या लोकांची देव परीक्षा घेणार, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Shukra Gochar: 15 सप्टेंबरपासून 'या' राशींचं नशीब फळफळणार; 1 वर्षानंतर शुक्र करणार सूर्याच्या घरात प्रवेश

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

SCROLL FOR NEXT