
कानाला कोणत्याही वेदना होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण तुम्हाला ब्रेन ट्यूमर होण्याचा धोका असू शकतो. कानाला काही दुखापत होत असतील तर हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या लक्षणांमध्ये चक्कर येते, डोळ्यांना त्रास होतो, तसेच बोलताना अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच कानामध्ये इंफेक्शन होतं. पुढे ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमरवर उपचार करणं फार कठीण आणि जोखमीचं काम असतं. यासाठी ६ ते ७ आठवडे रेडियोथेरपी केली जाते. मात्र त्याने तुम्हाला विविध साइट इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्याने तुम्हाला अन्न गिळताना सुद्धा त्रास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तसेच बेडवरून उठताना सुद्धा त्रास होऊ शकतो.
ग्लियोब्लास्टोमा ब्रेन ट्यूमर हा एक ब्रेन ट्युमरचाच एक प्रकार आहे. या ट्युमरची गाठ मेंदूच्या आतील भागात वाढत जात असते. त्याने मेंदुच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. पुढे हा आज एक गंभीर कॅन्सरचं रूप घेऊ शकतो.
डोकेदुखी
कानात वेदना होणे.
उलट्या होणे.
शरीरात कमजोरपणा जाणवणे.
ऐकू न येणे.
जुन्या गोष्टींचा विचार करणे.
मेलिग्नेंट ट्यूमर हा एक ब्रेन ट्यूमरचा भाग असतो. यामध्ये कॅन्सरच्या पेशी फार संवेदनशील असतात. या पेशी मेंदूमध्ये वेगाने वाढतात. फक्त मेंदूवरच परिणाम न करता डोक्याच्या इतर भागांवर आणि मणक्यावरही या पेशी पसरतात.
मेंदूच्या भागात बिनाइन ट्यूमर हा ट्यूमर नॉन कॅन्सरस असून तो काढूनही टाकता येतो. परंतु हा ट्यूमर पुन्हा होण्याचा धोका असतो. बिनाइन ट्यूमर मेंदूच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. काही रुग्णांमध्ये या ट्यूमरचे रुपांतर मेलिग्नेंट ट्यूमरमध्येही होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.