Shivani Kumari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Success Story: एकेकाळी चप्पल घ्यायलाही नव्हते पैसे, आता थेट 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये एन्ट्री; कोण आहे युट्यूबर शिवानी कुमारी?

Shivani Kumari Success Story: सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्ध होत आहे. अशीच एक इन्फ्लुएन्सर म्हणजे शिवानी कुमारी. शिवानी ही आता बिग बॉस ओटीटी ३ मध्ये दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे. सोशल मीडियावर लोक प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक खूप पैसे कमवतात. अशीच एक इन्फ्लुएन्सर म्हणजे शिवानी कुमारी. घरची गरीब परिस्थिती, एकेकाळी चप्पल घेण्यासाठीदेखील पैसे नव्हते परंतु आज शिवानीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे. सोशल मीडियामुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली आहे. एवढेच नव्हे तर शिवानी आता 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये दिसणार आहे. बिग बॉस हा रिअॅलिटी शो लोकप्रिय आहे. या शोमध्ये शिवानी दिसणार आहे.

शिवानी ही मूळ उत्तर प्रदेशमधील ओरैया जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिवानीचे बालपण गरीबीत गेले. शिवानीच्या वडिलांचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या आईने कुटुंबाची जबाबदारी स्वतः वर घेतली. शिवानीची आई एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्यानंतर अत्यंत गरीबीत शिवानीचे बालपण गेले. त्याचवेळी शिवानीला सोशल मीडियाबद्दल माहिती मिळाली. शिवानीने तिच्या गावाकडच्या वातावरणावर, तेथील परंपरेवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर शिवानीच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगली पसंती दर्शवली. काही दिवसांनी तिचे फॉलोवर्स वाढू लागले. मीडिया रिपोर्टनुसार, एका व्हिडिओतून २ लाख रुपये कमावते.

शिवानीने सुरुवातील टिक टॉक या अॅपवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवायची. त्यानंतर तिने गावातील भाषा, तेथील शैलीत व्हिडिओ बनवायला लागली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. टिक टॉक बंद झाल्यावर शिवानीने इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तिच्या युट्यूबच्या व्लॉगला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली. त्यानंतर शिवानी घराघरात पोहचली.

शिवानीने जेव्हा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली तेव्हा तिला शेजारच्या व्यक्तींनी तिला वेडी म्हटलं होतं. तिला टोमणे मारायचे. शिवानीच्या आईलादेखील हे व्हिडिओ बनवणे आवडायचे नाही. त्याच रागातून शिवानीची आई एक दिवस घरातून निघून गेली होती. परंतु शिवानीने कधीच हार मानली नाही. शिवानीने तिचे व्हिडिओ बनवणे सुरु ठेवले. त्यानंतर आज तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT