Subrata Roy Saharasri Biopic Announced  Instagram
मनोरंजन बातम्या

Subrata Roy Biopic: सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या बायोपिकची घोषणा; आयुष्याची संघर्षमय कथा दिसणार रुपेरी पडद्यावर

Subrata Roy Film: बॉलिवूड दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सुब्रत रॉय यांच्या ७५ व्या वाढदिवशी बायोपिकची घोषणा केली होती.

Chetan Bodke

Subrata Roy Saharasri Biopic

सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रता रॉय यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. मुंबईतल्या कोकिला बेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुब्रता रॉय हे सहारा इंडिया परिवारचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष होते.

‘सहाराश्री’ या नावाने त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली होती. त्यांनी १९७८ मध्ये सहारा इंडिया परिवाराची स्थापना केली. बॉलिवूड दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी सुब्रत रॉय यांच्या ७५ व्या वाढदिवशी बायोपिकची घोषणा केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुब्रत रॉय यांचा १० जून १९४८ रोजी जन्मदिवस. त्यांच्या वाढदिवशीच ‘सहाराश्री’ या चित्रपटाची निर्मात्यांनी घोषणा केली होती. त्यांच्या या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग आणि जयंतीलाल गडा करणार आहेत. सुब्रत रॉय यांच्या या बायोपिकमध्ये, चित्रपटाची कथा त्यांच्या संघर्षापासून ते देशातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्याचा त्यांचा प्रवास उलगडणार आहे.

बायोपिकच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील रिलीज केले होते. त्या मोशन पोस्टरमध्ये, सुब्रत रॉय यांची स्वाक्षरी असलेला २५ हजार कोटी रुपयांचा धनादेश दाखवण्यात आला आहे. त्या चेकवर The People Of India असं लिहिलेलं आहे. (Bollywood)

अद्याप सुब्रत रॉय यांच्या बायोपिकची जरी घोषणा झाली असली तरी, चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झालेली नाही. सुब्रत रॉय यांची भूमिका कोण साकारणार याची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. प्रमुख भूमिकेसाठी सध्या निर्माते आणि दिग्दर्शक बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत बातचीत करीत आहेत. चित्रपटाचे गीतकार गुलजार असून चित्रपटातील संगीताची जबाबदारी ए.आर.रहेमान यांच्याकडे आहे.

सुब्रत रॉय यांचे आयुष्य संघर्षमय होतं. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांच्या नेतृत्वात सहारा ग्रुपने यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. भारतातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये सुब्रत रॉय यांनी स्थान मिळवलं होतं.

सुब्रत रॉय यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन करिअरची सुरुवात केली होती. ‘इंडिया टुडे’ने २०१२मध्ये सुब्रत रॉय यांना त्या वर्षीच्या ‘सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व’ म्हणून घोषणा केली होती.

भारतातील अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचा उल्लेख प्रतिष्ठित ‘टाइम्स’ मासिकातही करण्यात आला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT