Subrata Roy Sahara: स्कूटरवर स्नॅक्स विकणारा विक्रेता ते सहारा समुहाचे मालक; असा होता सुब्रत रॉय यांचा जीवनप्रवास

Sahara Subrata Roy: सुब्रत रॉय यांचा जन्म १० जून १९४८ रोजी बिहारमधील अररिया येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता.
 Sahara Subrat Roy life journey subrata roy death sahara group income
Sahara Subrat Roy life journey subrata roy death sahara group incomeSaam TV
Published On

सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुब्रत रॉय यांचे आयुष्य संघर्षमय होतं. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांच्या नेतृत्वात सहारा ग्रुपने यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतातील आघाडीच्या उद्योगपतींमध्ये सुब्रत रॉय यांनी स्थान मिळवलं होतं. सुब्रत रॉय यांचा जन्म १० जून १९४८ रोजी बिहारमधील अररिया येथील एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. त्यांनी गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन करिअरची सुरुवात केली होती.

 Sahara Subrat Roy life journey subrata roy death sahara group income
IND vs NZ, Semi final: ही एकच गोष्ट वाढवणार टीम इंडियाचं टेन्शन; रोहित शर्मासमोरचं मोठं चॅलेंज नेमकं कोणतं?

एकेकाळी सुब्रत रॉय लॅम्ब्रेटा स्कूटरवर बिस्किटे आणि स्नॅक्स विक्री करीत होते. आपण आयुष्यात श्रीमंत व्हायचं खूप पैसा कमावायचा, मोठं साम्राज्य उभे करायचं, असं त्यांचं स्वप्न होतं. १९७८ मध्ये सुब्रत रॉय यांनी मित्रासोबत स्कूटरवर बिस्किटे आणि स्नॅक्स विकायला सुरुवात केली.

त्यासाठी त्यांनी दोनशे रुपयांची गुंतवणूक केली होती. उद्योगपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे सुब्रत रॉय यांनी मोठी रिस्क घेतली. एक चिटफंड कंपनी उघडून त्यांनी मित्रासोबत पॅरा बँकिंग सुरू केले. त्यावेळी १०० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीने त्याच्या कंपनीत २० रुपये गुंतवायला सुरुवात केली.

बघता-बघता सुब्रत रॉय यांची ही चिटफंट कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाली. लाखो लोकांनी सहारा ग्रुपमध्ये गुंतवणूक केली. सर्वसामान्य आणि गरीब जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. काही वेळातच, सहाराने अनेक क्षेत्रांमध्ये आपली पोहोच वाढवली. गृहनिर्माण क्षेत्र, मीडिया, मनोरंजन, आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, क्षेत्रात सहाराने मोठी कमाई केली.

याच काळात त्यांच्यावर फसवणूक करण्याचा आरोप करण्यात आला. गुंतवणूकदारांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुब्रत रॉय यांच्यासह त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ४ मार्च २०१४ रोजी त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते. या प्रकरणात दोन वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला होता.

सुब्रत रॉय यांना लहानपणापासून क्रिकेट आवड होती. त्यामुळे त्यांनी टीम इंडियाची स्पॉन्सरशिप घेतली होती. अनेक वर्ष भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सरशिप सहारा समुहाकडे होती. या काळात पुण्यातील स्टेडियमला सहारा सुब्रत रॉय स्टेडियम असं नावंही देण्यात आलं होतं. सुब्रत रॉय यांनी आयपीएलमध्ये संघही उतरवला होता.

 Sahara Subrat Roy life journey subrata roy death sahara group income
Daily Rashi Bhavishya: भाऊबीजेच्या दिवशी 'या' राशीच्या लोकांवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com