IND vs NZ, Semi final: ही एकच गोष्ट वाढवणार टीम इंडियाचं टेन्शन; रोहित शर्मासमोरचं मोठं चॅलेंज नेमकं कोणतं?

India vs New Zealand: न्यूझीलंडच्या संघ आयसीसीच्या स्पर्धेत नेहमीच भारतीय संघावर वरचढ ठरलेला आहे.
ind vs nz semi final head to head records icc world cup 2023 Latest Updates
ind vs nz semi final head to head records icc world cup 2023 Latest Updates Saam TV
Published On

India vs New Zealand Head To Head Records

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज टीम इंडियाचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी २ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी साखळी फेरीत आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अशातच सेमीफायनलआधी रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ind vs nz semi final head to head records icc world cup 2023 Latest Updates
Rohit Sharma News: रोहित शर्मानं सेमिफायनलआधी दिली मोठी कबुली; न्यूझीलंडविरुद्धचा प्लानही सांगितला!

न्यूझीलंडच्या संघ आयसीसीच्या स्पर्धेत नेहमीच भारतीय संघावर वरचढ ठरलेला आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत १० सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंडने १० पैकी ५ जिंकले असून टीम इंडियाला (Team India) केवळ ४ सामने जिंकता आलेले आहेत.

याशिवाय एक सामना अनिर्णयित राहिलेला आहे. २०१९ विश्वचषकातही भारतीय संघ चांगला लयीत होता. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या विजयाची गाडी सुसाट होती. मात्र, न्यूझीलंड संघाने सेमीफायनलमध्ये भारताचा विजयी रथ रोखला होता. (Latest Marathi News)

यानंतर टी-२० विश्वचषकातही न्यूझीलंडने ऐन मोक्याच्या क्षणी टीम इंडियाचा पराभव केला होता. इतकंच नाही, तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव करत विजेतेपद पटाकवलं होतं. त्यावेळी देखील भारतीय क्रिडाप्रेमींची निराशा झाली होती.

एकंदरीत आयसीसी नॉकआऊट सामन्यात न्यूझीलंडचा संघ टीम इंडियावर भारी पडलेला आहे. त्यामुळे न्यूझीलंडला आजच्या सामन्यातही पराभूत करणं भारतासाठी सोपं नसणार आहे. अशातच २०१९ विश्वचषकातील पराभव आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा वचपा काढण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध नेमकी कोणती रणनिती आखतो, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

अशी असू शकते न्यूझीलंडची प्लेइंग-११

केन विल्यमसन (कॅप्टन), टॉम लॅथम (विकेटकीपर), डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, कायल जेमिसन, जेम्स नीशम.

ind vs nz semi final head to head records icc world cup 2023 Latest Updates
Abdul Razzaq Controversial Statement: पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं ऐश्वर्या रायवर वादग्रस्त वक्तव्य, विधानामुळे नेटकरी संतप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com