Subodh Bhave SAAM TV
मनोरंजन बातम्या

Subodh Bhave : मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेत; संत तुकाराम महाराज यांचा रोल करणार, पहिला PHOTO समोर

Subodh Bhave Hindi Movie : मराठमोळा अभिनेता सुबोध भावे लवकरच हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे संत तुकारामांच्या रुपात पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

बहुप्रतिक्षित 'संत तुकाराम' (Sant Tukaram) चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'संत तुकाराम' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन आदित्य ओम यांनी केले आहे. 'संत तुकाराम' चित्रपट 17व्या शतकातील महान मराठी संत-कवी संत तुकाराम यांच्या जीवनावर, विचारसरणीवर आणि त्यांच्या भक्ती चळवळीवर आधारित आहे.

'संत तुकाराम' चित्रपटात इतिहासाची मांडणी, कला आणि प्रभावी थिएटर अनुभव प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. संत तुकाराम यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे. सुबोध भावेने (Subodh Bhave) आजवर अनेक मराठी चित्रपट, नाटकांमध्ये काम केले आहे. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. त्यामुळे आपल्या प्रभावी अभिनय शैलीतून संत तुकाराम महाराजांचे दुःख, संघर्ष यांचे प्रभावी चित्रण मोठ्या पडद्यावर मांडणार आहेत.

'संत तुकाराम' चित्रपटाची रिलीज तारीख?

'संत तुकाराम'चित्रपट 18 जुलै 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशा व्यक्तिमत्वाची कथा सांगतो ज्याची शांतता ही बंडापेक्षा प्रभावी होती आणि ज्याची कविता सत्याची आवाज झाली. या चित्रपटाची कथा 17व्या शतकातील महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आहे. जिथे संत तुकाराम वैयक्तिक दुःखातून बाहेर येऊन समाजातील शोषित, वंचित लोकांचा आवाज बनतात. ते भक्तीमय अभंग गातात.

'संत तुकाराम' स्टारकास्ट

'संत तुकाराम' चित्रपटात सुबोध भावेसोबत शिव सूर्यवंशी, शीना चोहान, संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, ललित तिवारी, मुकेश भट्ट, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव आणि डीजे अकबर सामी हे कलाकार देखील झळकणार आहेत. दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना या चित्रपटाचे सूत्रधार म्हणून दिसणार आहेत. त्यांच्या प्रभावी आवाजातून चित्रपटाला एक आध्यात्मिक दृष्टी आणि संदर्भ मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT