Stree 2 OTT SAAM TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 OTT : मोठ्या पडद्यावर धमाल करणारी 'स्त्री' OTT वर येतेय, पण कुठे?

Horror Comedy Movie Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. अशात आता प्रेक्षक चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. 'स्त्री 2' च्या OTT रिलीजचे नवे अपडेट जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव ( Rajkummar Rao ) यांचा 'स्त्री 2' चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर वेगाने कमाई करत आहे. मात्र, प्रेक्षक आता त्याच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहेत. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या OTT रिलीझचे अपडेट आले आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ ॲमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) रिलीज होणार आहे. ॲमेझॉन प्राइमने ‘स्त्री २’ (stree 2 ) चे राइट्स विकत घेतले आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपट ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

'स्त्री २' ची स्टार कास्ट

'स्त्री २' हा ब्लॉकबस्टर चित्रपट अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्याशिवाय अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि सुनीता राजवार यांसारखे कलाकार दिसले आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमार आणि वरुण धवन यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे. या चित्रपटात तमन्ना भाटियाचाही एक कॅमिओ आहे. तमन्नाचे 'आज की रात' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

SCROLL FOR NEXT