Stree 2 Box Office Collection Day 13
Stree 2 Box Office collectionSAAM TV

Stree 2 Box Office Collection : १३ व्या दिवशी 'स्त्री २'ची बंपर कमाई, ५०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

Stree 2 Box Office Collection Day 13 : श्रद्धा कपूरचा 'स्त्री २' बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करताना पाहायला मिळत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या खूप पसंतीच पडला आहे. आता हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहे.
Published on

सध्या सर्वत्र 'स्त्री 2' (Stree 2) चा गाजावाजा पाहायला मिळत आहे. 'स्त्री 2' ची भारतात आणि जगभरात कमाई कौतुकास्पद आहे. खूप कमी वेळात 'स्त्री 2' ने मोठी कमाई केलेली पाहाला मिळत आहे. जन्माष्टमीच्या सणामुळे सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घट झालेली आपल्याला पाहायला मिळाले. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली आहे.

Stree 2 Box Office Collection Day 13
Rajkummar Rao : 'Stree 2' मधून काढून टाकण्यात आलेले Funny सीन्स; राजकुमारचा लूक पाहून पोट धरून हसाल

श्रद्धा कपूर (shraddha Kapoor) आणि राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) 'स्त्री 2' अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने काही दिवसांतच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. वर्किंग डेजमध्ये देखील या चित्रपटाचा वेग कमी होत नाही. मंगळवारचे 'स्त्री 2'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

'स्त्री 2' 13 व्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

'स्त्री 2' हा हॉरर कॉमेडी चित्रपट पाहण्यासाठी लोक कामातून वेळ काढून वर्किंग डेजला देखील चित्रपट पाहायला जात आहेत. 'स्त्री 2' च्या संध्याकाळच्या शोचे कलेक्शन खूप पाहायला मिळते. तसेच संध्याकाळचे शो देखील हाऊसफुल असतात. कामाच्या ताणातून कुटुंबासह या चित्रपटाचा आनंद घेताना लोक दिसत आहेत.

Stree 2 Box Office Collection Day 13
Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? 'या' टीव्ही अभिनेत्याच्या नावची चर्चा

'स्त्री २'ची 500 कोटींच्या क्लबकडे वाटचाल

13 दिवसांत स्त्री 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 443.5 कोटी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. ज्या वेगाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धावत आहे, त्या वेगाने तो लवकरच 00 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 'स्त्री २' जगभरातील कलेक्शनमध्ये 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे.

Stree 2 Box Office Collection Day 13
Yudhra Release Date : 'युध्रा' ची रिलीज डेट आऊट, सिद्धांत चतुर्वेदीचा किलर लूक पाहून चाहते चकीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com