Stree 2 Release Date Saam TV
मनोरंजन बातम्या

Stree 2 Release Date : 'स्त्री 2' या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच प्रेक्षकांना मिळणार एक मोठं सरप्राईज

Stree 2 Release Date : सध्या चित्रपटाबाबत असे काही अपडेट समोर येत आहेत, जे ऐकूण चाहत्यांना आनंद होईल. खरंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज दिले आहे.

Sejal Purwar

स्त्री 2' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्याच्या रिलीजला फारसा वेळ राहीलेला नाही. अशा परिस्थितीत या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे. आता चित्रपट निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. सध्या चित्रपटाबाबत असे काही अपडेट समोर येत आहेत, जे ऐकूण चाहत्यांना आनंद होईल. खरंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज दिले आहे. आता 15 ऑगस्टला रिलीज होणारा हा चित्रपट तुम्हाला 14 ऑगस्टलाच पाहता येणार आहे. अर्थातच एक दिवस आधीच हा चित्रपट बघता येणार आहे. यासठी देशभरात विशेष स्क्रीनिंग केले जाणार आहे. आणि त्यासाठी मर्यादित तिकीटे असतील.

या चित्रपटात तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा त्यांच्या कॉमिक शैलीने आपल्याला हसवणार आहेत. यात वरुण धवनचा कॅमिओही दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये चित्रपटातील सर्व पात्रे बघायला मिळतात.

'स्त्री 2' चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. हा चित्रपट एक हॉरर-कॉमेडी आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना हसवण्यासोबतच त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या प्रदर्शनासाठी जोरदार प्रमोशन केले आहे, ज्यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत. 'स्त्री 1' ज्यांनी पाहीला आहे त्यांच्यासाठी 'स्त्री 2' एक पर्वणीच असणार आहे.

रात्रीच्या शोचे नियोजन: चित्रपटाचे निर्माते 14 ऑगस्ट रोजी रात्रीच्या शोचे नियोजन आखत आहेत. या रात्रीच्या शो मध्ये प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

स्पेशल स्क्रीनिंग: या चित्रपटाचे हे स्पेशल स्क्रीनिंग देशभरात केले जाईल. यासाठी मर्यादित तिकिटे असतील. त्यामुळे तुम्हाला जर 14 तारखेलाच चित्रपट बघायचा असेल तर लवकर तिकीट बुक करा

टीझर रिलीजः 'स्त्री 2' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरने सर्वांची उत्सुकता वाढवली आहे आणि या चित्रपटातील सर्व पात्रे त्यात झळकत आहेत. टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

फर्स्ट लूक: मेकर्सनी 'स्त्री 2'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. त्यात एक लहान रीकॅप देखील पाहिले जाऊ शकते. ज्यात स्त्री1 संदर्भात काही माहिती दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाची कथा: 'स्त्री 2' चित्रपटात तमन्ना भाटिया, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी पुन्हा एकदा त्यांच्या कॉमिक शैलीने आपल्याला हसवत आहेत. यामध्ये वरुण धवनचा कॅमिओ देखील दिसणार आहे. या चित्रपटाची कथा एक हॉरर-कॉमेडी आहे जी चाहत्यांना अखेरपर्यंत जोडून ठेवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई महानगरपालिकेचे ठेकेदारांनी अर्धवट काम करून बिल काढली

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT