State Government  
मनोरंजन बातम्या

State Government: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि शिवाजी साटम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

State Government : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा केली.

Bharat Jadhav

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येतो. वर्ष २०२३ साठीचा स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झालाय. तर शिवाजी साटम यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय. ऑगस्ट २१ रोजी एका विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी या पुरस्कारांची घोषणा केली.

स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन.चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आलाय. स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये १० लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये ६ लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.

राज्याचेच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करणाऱ्या या कलाकारांचा आपणा सर्वांना अभिमान आहे. त्यांना पुरस्कार जाहीर करतांना मनापासून आनंद होत आहे. हे सर्वजण सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव अधिकाधिक उंचावत राहतील, अशा शब्दात मंत्री मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, हा पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता एनएससीआय (NSCI) डोम, वरळी मुंबई येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT