Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

Asha Parekh Got Dadasaheb Phalke Award: १९९२ मध्ये चित्रपट क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या योगदानामुळं त्यांना सरकारकडून प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
Asha Parekh
Asha ParekhSaam TV
Published On

नवी दिल्ली: हिंदी चित्रपटसृष्टीत १९६०-७० च्या दशकात चित्रपटांत अभिनयाची छाप सोडणाऱ्या आणि केवळ अभिनयच नव्हे तर, मानधनामुळं नेहमीच चर्चेत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.

दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना २०२२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. आशा पारेख यांनी तसं बघितलं तर अभिनयातून कधीच निवृत्ती घेतली आहे. पण ६०-७० च्या दशकातील उत्तम अभिनेत्रींपैकी त्या एक होत्या. त्यांच्या काळात मोठ्या पडद्यावर राज्य करणाऱ्या आशा पारेख यांची जबरदस्त चर्चा व्हायची. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून त्यांचं इंडस्ट्रीत नाव होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com