Thoda Tuza Aani Thoda Maza Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thoda Tuza Aani Thoda Maza : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेत ओमप्रकाश शिंदे आणि गार्गी फुलेंची होणार एण्ट्री; मालिकेमध्ये येणार नवा ट्वीस्ट

Thoda Tuza Aani Thoda Maza Serial : 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लवकरच मालिकेत दोन प्रसिद्ध कलाकारांची एन्ट्री होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मानसी, तेजस आणि गायत्रीसोबत मालिकेतल्या इतर व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरत आहेत. लवकरच मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ओमप्रकाश शिंदे आणि दिवंगत अभिनेते निळु फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांची एण्ट्री होणार आहे.

रजनी सरपोतदार आणि रणजीत सरपोतदार असं या दोघांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रजनी सरपोतदार खानदानी श्रीमंत आहे. पतीच्या निधनानंतर न खचता तिने खानदानी व्यवसायाचा डोलारा सांभाळला. तिचा स्वभाव अहंकारी आहे. रोहिणी अंधश्रद्धाळू आणि जरा जुन्या संकोचीत विचारांची आहे. मुहूर्त, शकुन, अपशकुन ह्यावर तिचा खूप विश्वास आहे. एकुलता एक मुलगा म्हणजेच रणजीतच्या बाबतीत ती खूपच पजेसिव्ह आहे. रणजीत आपल्या शब्दाबाहेर नाही याचा तिला अभिमान आहे. रणजीत प्रमाणेच आपल्या आज्ञेत राहणारी सूनच आपल्या घरी यावी असं तिला वाटतं.

ओमप्रकाश शिंदे साकारत असलेला रणजीत सरपोतदार हे पात्र शांत, सुस्वभावी, सरळमार्गी आहे. तोंडावर साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्याचा स्वभाव आहे. तो आईच्या शब्दाबाहेर नाही. वडील गेल्यानंतर त्याने आपल्या आईला उत्तमरित्या आपला फॅमिली बिझनेस चालवताना पाहिलं आहे. तिलाच आदर्श मानून तो सुद्धा हुशारीने बिझनेस पुढे नेतोय.

आत्तापर्यंत कोणताही निर्णय त्याने आईला विचारल्याशिवाय घेतला नाही. त्यामुळे स्वतः निर्णयक्षम नाही. म्हणून आता लग्नसुध्दा आई सांगेल त्या मुलीशी करुन संसार थाटायचा असं त्याने ठरवलं आहे. दिसायला रुबाबदार आणि कायम हसतमुख असल्याने समोरच्या व्यक्तीला तो आपल्या मोहात पाडतो. अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या रणजीत आणि रजनीचा मानसी आणि तिच्या कुटुंबात कसा प्रवेश होणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

SCROLL FOR NEXT