S.S.Rajamouli Saam Tv
मनोरंजन बातम्या

S.S.Rajamouli: राजामौली चित्रपटसृष्टीतील 'हुकूमशहा' पण..., हॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत...

राजामौली लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या विचारात आहे.

Chetan Bodke

S.S.Rajamouli: एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'आर.आर.आर' चित्रपटाची सध्या भारतातच नाही तर परदेशातही चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातील गाण्याने नुकतेच काही पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. गोल्डन ग्लोब आणि क्रिटिक्स केअर पुरस्काराचे मानकरी ठरल्यानंतर हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. आता राजामौली लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या विचारात आहे.

दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि त्यांचा चित्रपट RRR सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड जिंकल्यानंतर त्यांना आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये हात आजमावायचा आहे. राजामौली यांनी गेल्या आठवड्यात दोन पुरस्कारांवर आपले नाव कोरल्यानंतर हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरॉन यांचीही भेट घेत दोघांनीही चित्रपटाचं तोंड भरुन कौतुक केले.

आरआरआर चित्रपटातील कलाकार ज्यु. NTR आणि राम चरण यांना हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल विचारण्यात आले. आता या विषयावर दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही चर्चा केली. एका अमेरिकन पॉडकास्टशी बोलताना राजामौली म्हणाले, "हॉलिवूडमध्ये चित्रपट बनवणे हे जगभरातील प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाचे स्वप्न असते. मी यापेक्षा वेगळा नाही. मी प्रयोग करण्यास तयार आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

सोबतच दिग्दर्शक राजामौली पुढे म्हणतात, "आता पुढे काय करायचे या विचाराने मी थोडा गोंधळात पडलो आहे. भारताबद्दल बोलायचं झालं तर मी तिथला हुकूमशहा आहे. चित्रपट कसा बनवायचा हे तिथलं कोणीही मला सांगू शकत नाही. कदाचित मी माझा पहिला प्रोजेक्ट हॉलिवूडसोबत करेन."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT