Sonu Sood: सोनू सूदची पुन्हा कौतुकास्पद कामगिरी; दुबई विमानतळावर वाचवले प्रवाशाचे प्राण...

सोनुने दुबई विमानतळावर पुन्हा एकदा एका प्रवाशाला मदत केली आहे.
Sonu Sood
Sonu SoodSaam Tv

Sonu Sood: २०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा फटका बसला होता. पण या संपूर्ण काळात भारतात अनेक जण नागरिकांसाठी देवदुतासारखे मदतीला धावुन गेले होते. त्यातीलच एक देवदुत म्हणजे बॉलिवूड अभिनेता सोनू सुद. सोनुने कोरोना महामारीत अनेक स्थलांतरितांना मदतीचा हात पुढे करत त्यांच्या मदतीला धावुन गेला होता. आजही सोनु अनेकांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो.

Sonu Sood
Bholaa Motion Poster: तब्बूच्या 'भोला'मधील लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, दिसणार डॅशिंग अवतारात...

दरम्यान सोनुने दुबई विमानतळावर पुन्हा एकदा एका प्रवाशाला मदत केली आहे. दुबई विमानतळावर सोनुने एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सोनू सूद दुबईतील इमिग्रेशन काउंटरवर थांबला असताना एक व्यक्ती बेशुद्ध पडली.

त्या व्यक्तीला बघून तिथे उभ्या असलेल्या लोकांनी कोणत्याही प्रकारची त्याला मदत केली नाही. पण सोनूने वेळ न दवडता त्या माणसाचे डोके पकडले आणि त्याला आधार देत त्याला कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन (Cardiopulmonary Resuscitation- CPR) केल्याने काही मिनिटातच तो शुद्धीवर आला.

Sonu Sood
Javed Akhtar Birthday: शबाना आझमींनी दिला उत्कृष्ट नात्यांचा कानमंत्र...

सोनू सूद या कामामुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. सोबतच त्याने ज्या प्रकारे व्यक्तीचे प्राण वाचवले, त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय पथकानेही सोनुचे कौतुक केले. शुद्धीवर आल्यानंतर त्या व्यक्तीने सोनूचे मनापासून आभार मानले. हे वृत्त कळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर सोनुचे खुप कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com