Famous Actress  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : डोळे सुजले, दात तुटला; अभिनेत्रीवर क्लबमध्ये भयंकर हल्ला, चेहऱ्याची वाईट अवस्था|VIDEO

Famous Actress Video : प्रसिद्ध अभिनेत्रीवर भयंकर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्याची वाईट अवस्था झाली. व्हिडीओ शेअर करून तिने थरारक प्रसंग सांगितला आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीवर क्लबमध्ये भयंकर हल्ला झाला.

अभिनेत्रीचे डोळे सुजले आणि दात तुटला.

अभिनेत्रीच्या चेहऱ्याची वाईट अवस्था झाली.

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्रीवर मुंबईत भयंकर हल्ला झाला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला १६ फेम प्रीत सिंग आहे. स्वतःसोबत घडलेल्या या घटनेने अभिनेत्री खूपच हादरली आहे. प्रीतने इन्स्टाग्रामवर एक वेदनादायक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना ही धक्कादायक माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीचे डोळे सुजलेले आहेत. तसेच तिच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत.

प्रीत सिंगवर मुंबईतील एका क्लबमध्ये हल्ला झाला. हल्ला इतक्या जोरात होता की, मारहाणीत तिचे दात तुटले आणि चेहरा खूप सुजला. प्रीतसोबत घडलेल्या या घटनेने चाहते हादरले आहेत. लोकांनी सार्वजनिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे. व्हिडिओमध्ये प्रीतचे डोळे लाल आणि सुजलेले दिसत आहेत.

प्रीत सिंगची पोस्ट

"मी नेहमीच ऐकलं होतं की मुंबई मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे, पण येथे माझ अस स्वागत होईल अशी मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे लिहित असतानाही, मी थरथरत आहे, माझे डोळे सुजले आहेत, माझ्या चेहऱ्यावर जखमा आहेत आणि जे घडलं ते मी अजूनही पचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत एका क्लबमध्ये आरामात बसून मजा करत होते, तेव्हा एक मुलगी अचानक ओरडायला लागली आणि आम्हाला आत येऊच कसं दिलं, असा प्रश्न विचारू लागली. जे एका शाब्दिक वादाने सुरू झालं होतं, ते तिच्या पुरुष मित्राने मध्ये येऊन आमच्यावर शारीरिक हल्ला केल्यावर एका भयंकर घटनेत बदलले. मला इतका मार लागला की माझा दात तुटला आणि माझा चेहरा सुजला. लोकांनी हस्तक्षेप केल्यावरच परिस्थिती थांबली. नंतर मला कळलं की ती मुलगी एक 'इन्फ्लुएन्सर' आहे. असं काही इतक्या उघडपणे घडू शकते या विचाराने मी अजूनही हादरले आहे. कोणासोबतही असं व्हायला नको..."

प्रीत सिंगच्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट्स करताना दिसत आहे. तसेच तिला काळजी घेण्यासाठी बोलत आहेत. तिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रीतची अवस्था पाहून लोकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रीत सिंग ही एक सोशल मीडिया स्टार आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तर तरूणाईमध्ये तिची क्रेझ पाहायला मिळते. इन्स्टाग्रामवर आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. ती अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

Vande Bharat Expressway : मध्यरात्री अडीच वाजता वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांचे मेगाहाल

तापमानाचा भडका, राज्यात होरपळ; नागपुरात उष्मघाताचे 13 बळी? आज कोणत्या जिल्ह्याला इशारा?

AAP: 'न्याय मिळण्याची अपेक्षा संपली'; केजरीवालांचा न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवरच सवाल

यंदा उष्माघातानं लाखो बळी जाणार? जगावर पुन्हा 'सुपर एल निनो'चं संकट?

SCROLL FOR NEXT