"जय महाराष्ट्र, मराठी माणूस थांबता कामा नये..."; Bigg Boss फेम अभिनेत्याची मोठी घोषणा

Bigg Boss Fame Actor Supports Marathi Manus : 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने मोठी घोषणा केली आहे. मराठी माणसाला कणखर पाठिंबा दिला आहे. अभिनेता नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Bigg Boss Fame Actor Supports Marathi Manus
Bigg BossSAAM TV
Published On
Summary

बिग बॉस फेम अभिनेत्याची मराठी भाषेसंबंधीची पोस्ट व्हायरल होत आहे.

अभिनेता मराठी माणसाच्या मदतीला धावून आला आहे.

अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मोठी घोषणा केली आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेचा बोलबाला पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली आहे. तसा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी याचा विरोधात आवाज उठवला आहे. यामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ४ मे पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होणार आहे. अशात 'बिग बॉस मराठी २' चा विजेता आणि अभिनेता शिव ठाकरे मराठी माणसाच्या मदतीला उतरला आहे.

शिव ठाकरेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे, जी तुफान व्हायरल होत आहे. संपाच्या वेळी शिव ठाकरे त्याची गाडी टॅक्सी म्हणून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी वापरणार आहे. त्याने पोस्टमध्ये गाडीचा नंबर देखील टाकला आहे. शिव ठाकरेच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. त्याला जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्याने सर्वसामान्य जनतेचे मन जिंकले.

Shiv Thakare
Shiv Thakare saam tv

शिव ठाकरेची पोस्ट

"राम राम महाराष्ट्र,

४ मे रोजी टॅक्सी ड्रायव्हर्सचा संप आहे.

तरीही आपल्या सेवेत तुम्हाला कुठेही MH 27 DK 0909 (टाटा हॅरियर) ही तुमच्या हक्काची टॅक्सी, रिक्षा दिसल्यास हक्काने थांबवणे.

आपली खूण एकच – गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र आणि ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा असलेला दादा आपल्या सेवेस सदैव तत्पर...

काहीही हो... मराठी माणूस थांबता कामा नये.

तुमचा आपला माणूस शिव ठाकरे..."

शिव ठाकरे वर्कफ्रंट

'बिग बॉस मराठी 2' चा विजेता शिव ठाकरे टिव्ही इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. त्याने आजवर अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. नुकतेच शिव ठाकरेने व्यवसायात एन्ट्री घेतली आहे. त्याने amraa studio salons अमरावतीमध्ये उघडले आहे. अलिकडेच शिव ठाकरे THE50 मध्ये दिसला होता. त्याने रोडीज, बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी, खतरों के खिलाडी, झलक दिखला जा या शोमध्ये भाग घेतला होता.

Bigg Boss Fame Actor Supports Marathi Manus
लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com