Spirit Controversy Deepika Padukone  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: 'मी माझ्या निर्णयांवर ठाम...; 'स्पिरिट' चित्रपटाच्या वादावर दीपिका पदुकोण स्पष्टच बोलली

Spirit Controversy Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, दीपिकाने एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Shruti Vilas Kadam

Spirit Controversy Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' या चित्रपटातून अचानक बाहेर पडल्यामुळे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, दीपिकाने स्टॉकहोममध्ये दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिने म्हटले, "मी माझ्या निर्णयांवर ठाम आहे, ज्यामुळे मी खूप शांत आहे." या विधानामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या स्पष्ट मताचे कौतुक केले आहे .

'स्पिरिट' या चित्रपटातून दीपिकाच्या बाहेर पडण्यामागे, तिने 8 तासांच्या कामचा वेळ मागितला पण दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्याशी मतभेद झाल्याची चर्चा आहे . या घटनेनंतर, संदीप रेड्डी वंगा यांनी सोशल मीडियावर दीपिकावर चित्रपटाची कथा लीक केल्याची अप्रत्यक्ष टीका केली, ज्यात त्यांने तिला 'डर्टी पीआर गेम्स' खेळल्याचा आरोप केला .

दीपिका पदुकोणने आपल्या मानसिक आरोग्याच्या अनुभवांवर आधारित 'द लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन' स्थापन केली आहे, ज्याद्वारे ती मानसिक आरोग्याविषयी जनजागृती पसरवण्याचे काम करत आहे. तिच्या मते, मानसिक शांतता आणि स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

दीपिका पदुकोण काम

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल झाले तर, सप्टेंबर २०२४ मध्ये तिची मुलगी दुआ हिच्या जन्मानंतर दीपिका पदुकोणने ब्रेक घेतला होता. तिचा पुढचा चित्रपट शाहरुख खानसोबत "किंग" असल्याची चर्चा आहे. तिच्याकडे अमिताभ बच्चनसोबत "द इंटर्न" चा बॉलिवूड रिमेक देखील पाइपलाइनमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT