Shruti Kadam
सचिन आणि अंजली यांची पहिली भेट मुंबई विमानतळावर झाली होती. सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतत असताना अंजली आपल्या आईला रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर आल्या होत्या. त्याच क्षणी दोघे एकमेकांकडे आकर्षित झाले, परंतु त्या वेळी त्यांच्यात कोणतीही संवाद झाला नव्हता.
विमानतळावरील पहिल्या भेटीनंतर काही काळाने दोघांची दुसरी भेट एका पार्टीत झाली. याच पार्टीत त्यांच्या संवादाची सुरुवात झाली आणि त्यांच्या नात्याची घडी बसू लागली.
अंजली या डॉक्टर असून वयाने सचिनपेक्षा सुमारे ६ वर्षांनी मोठ्या आहेत. तरीही त्यांच्या नात्यात वयाचे अंतर कधीच अडथळा ठरले नाही.
सचिन आणि अंजली यांनी २५ मे १९९५ रोजी विवाह केला. त्यांच्या विवाहाला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि त्यांच्या मुलगी सारा हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या काही खास फोटोज शेअर केले आहेत.
सचिन आणि अंजली यांना दोन मुले आहेत – सारा आणि अर्जुन. सारा ही सोशल मीडियावर सक्रिय असून, अर्जुन आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.
अंजली या पेशाने डॉक्टर असून, विवाहानंतर त्यांनी आपल्या वैद्यकीय करिअरचा त्याग करून कुटुंबाला प्राधान्य दिले. त्यांचा हा निर्णय त्यांच्या नात्याच्या दृढतेचे प्रतीक आहे.
सचिन आणि अंजली यांची प्रेमकथा एकदम चित्रपटासारखी आहे – एक नजर, एक प्रेम. विमानतळावरची ती पहिली भेट, नंतरची पार्टीतील संवादाची सुरुवात, आणि शेवटी विवाह हे सर्व त्यांच्या प्रेमकथेचे सुंदर अध्याय आहेत.